माणसाचा परिचय...

 



नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण आशा करतो सर्वजण मजेत आणि आनंदी असाल... 


मित्रांनो, आज आपण एक प्रेरणादायी बोधकथा वाचणार आहोत... चला तर मग बोधकथा वाचायला सुरुवात करूया... 😊

 

👉मित्रांनो, एके दिवसी राजा आणि राजदरबारमधले काही व्यक्ती शिकारीसाठी एका जंगलात जातात... 


राजाला काही अंतरावर एक हरीण दिसते, त्या हरीणची शिकार करण्यासाठी राजा त्या हरीणमागे धावतो... धावत धावत राजा त्यांच्या सैनिकापासुन खूप अंतरावर खूप दुर चालल्या जातो... 


👉 तिकडे सैनिक राजाची वाट पाहत बसतात. काही वेळाने अंधार पडायला सुरुवात होते... 


सैनिक प्रधानला म्हणतो, प्रधानजी अंधार पडत आहे. महाराज अजुन शिकार करून परत आले नाही. आपण त्यांना पाहायला जंगलाच्या आत जायाला नको का...??? 


प्रधान सैनिकाचे म्हणणे ऐकतो आणि सैनिकाला म्हणतो, ठीक आहे, तुम्ही महाराजाला शोधण्यासाठी जंगलामध्ये जा... 


👉 सैनिक जंगलाच्या आत जातो... आणि राजाला शोधतो... तेवढ्यात त्या सैनिकाला एक साधु महाराज दिसतात... 


साधु महाराज हे एका झाडाखाली  तपस्याला बसलेले असतात. 

सैनिक त्या साधु महाराजाला विचारतो, ओय भिकारी माणसा तु इकडे आमच्या राजाला पाहिले आहे का.?  

त्यावर साधु महाराज म्हणतात, नाही बाळा, मी नाही पाहिले, मी एक आंधळा व्यक्ती आहे. परंतु काही वेळाआधी मी घोड्याचा आवाज ऐकला होता. तो आवाज उत्तरेकडुन येत होता... 

त्यावर सैनिक म्हणतो, चूप बस मूर्ख माणसा... आणि सैनिक निघुन जातो... 



थोड्या वेळात, तेथे सेनापती येतो... तो सुद्धा त्या साधु महाराजाला मोठ्या आवाजात प्रश्न करतो... साधु महाराज तुम्ही आमच्या राजाला ईकडे पाहिले आहे का..?? 

साधु महाराज म्हणतात बाळा मी एक आंधळा व्यक्ती आहे. मला काहीच दिसत नाही. 


परंतु मी काही वेळा आधी उत्तरेकडे घोड्याचा आवाज ऐकला होता.. 

त्यावर सेनापती म्हणतो.. मी या आंधळ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः दुसऱ्या दिशेला राजाला शोधलं पाहिजे आणि सेनापती निघुन जातो... 


👉 पून्हा थोड्या वेळात, तिथे प्रधान येतो... 

साधुकडे प्रधान जातो आणि म्हणतो... नमस्कार साधु महाराज, 🙏साधु महाराज आम्ही आमच्या राजाला शोधत आहोत  तुम्ही आमच्या राजाला पाहिले आहे का.?पाहिले असेल तर कृपया मला सांगा... 


त्यावर साधु महाराज म्हणतात, बाळा मी एक आंधळा व्यक्ती आहे. मला काही ही दिसत नाही परंतु मी थोड्या वेळा आधी उत्तरेकडे घोड्याचा आवाज ऐकला होता. 


 त्यावर प्रधान म्हणतो धन्यवाद साधु महाराज तुम्ही आमची खूप मोठी मदत केली आहे... धन्यवाद 🙏 एवढे बोलुन प्रधान समोर चालल्या जातो... 



आता थोड्या वेळात त्या साधु महाराज जवळ एक घोडेस्वार येतो. घोडेस्वार सर्वात आधी त्या साधुला दोन्ही हात जोडून नमस्कार करतो, आणि म्हणतो 


गुरुजी माझा नमस्कार स्वीकार करा... त्यावर ते साधु महाराज म्हणतात... अच्छा तुम्हीच राजा आहात...  हे राजंन तुम्हाला तुमचे सैनिक, सेनापती, आणि प्रधान शोधत आहेत. 


त्यावर राजा म्हणतो, हे गुरुदेव तुम्ही तर आंधळे आहात मग तुम्ही मला कसे ओळखले की मीच राजा आहे... आणि त्या तिघांना सुद्धा तुम्ही कसे ओळखले कृपया मला सांगा... 



त्यावर साधु महाराज म्हणतात... भाषा वरून मी सर्वाना ओळखले आहे... 


माझ्याकडे सर्वात आधी सैनिक आला होता. त्याने मला प्रश्न केले.. घाणरेडी भाषा वापरली... 


दुसरा व्यक्ती सेनापती होता... त्याचा आवाज खूप कडक होता आणि त्याने मला कडक आणि मोठ्या आवाजात प्रश्न विचारले... 


तिसरा व्यक्ती प्रधान होता... प्रधानने मला नमस्कार करून नम्र आणि प्रेमाने प्रश्न विचारले... 



👉  चौथा व्यक्ती म्हणजे तुम्ही राजा 

जेंव्हा तुम्ही माझ्याकडे आले तर तुमच्या भाषेने तुमचा परिचय करून दिला आहे... 


समोर साधु महाराज म्हणतात, ये राजनं माणसाच्या भाषेवरून माणसाचा परिचय होतो. माणसाला ओळखण्यासाठी डोळे असणे गरजेचं नाही. तुम्ही कानाद्वारे सुद्धा माणसाला ओळखू शकता... 


हा संदेश ऐकून राजा म्हणतो... धन्यवाद साधु महाराज तुम्ही आज मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे...  तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏


👉 मित्रांनो, गोष्टीचा सारांश असा आहे की, तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलता कसे यावरून तुमचा परिचय होत असतो... तुम्ही ज्या पण व्यक्तीला भेटाल त्या व्यक्तीसोबत प्रेमाने बोलायाला शिका... प्रत्येक व्यक्तीची रिस्पेक्ट करायाला शिका... 


तुम्ही जर एखाद्या नवीन व्यक्तीला भेटत असाल तर त्या व्यक्तीला आनंदाने भेटा... प्रेमाने बोला आणि आपुलकीचे दोन, चार प्रश्न विचारा, मग पाहा काय जादु होते... समोरचा व्यक्ती तुम्हाला भेटुन आनंदी होईल तुम्हाला पण आनंद मिळेल आणि तो व्यक्ती तुम्हाला कधीच विसरणार नाही... 😊


मित्रांनो, तुम्हाला भेटुन समोरच्या व्यक्तीला आनंद व्हायला पाहिजे असं स्वतःचे व्यक्तीमहत्व बनवा... 👍


आजची गोष्टी आवडली असेल तर स्वतःच्या व्यक्तिमत्वबद्दल नक्की विचार करा


📚 विशेष📚

👉 मित्रांनो, 21 जुलै 2022 पासुन Time Management चा कोर्स सुरु होत आहे... पूर्ण कोर्स 12 दिवसाचा आहे...( कोर्स Free नाही ) 


ज्या व्यक्तीला कोर्समध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी मला कॉल किंवा व्हाट्सअप msg करावा... कोर्स विषयी सर्व माहिती व्हाट्सअपला मिळेल... 


Whatsapp No.9545441697


धन्यवाद... 🙏


✍️✍️ नरेंद्र दिपके

( Coach Of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट