पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही विचार महत्त्वाचे असतात....
मित्रांनो, जीवन असेल किंवा दुनिया, दोघांना ही बॅलेन्स ठेवण्यासाठी पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचारांची गरज असते.....
लहानपणापासून आपण सर्वजण हेच ऐकत आलो आहे की, पॉजिटीव्ह विचार करा, पॉजिटीव्ह विचार करायला हवा... निगेटिव्ह विचार करू नका...ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहे...
परंतु, कधी कधी निगेटिव्ह विचार पण आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात....
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचार का गरजेचे आहे, याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे....👍🏻👍🏻
मित्रांनो, उद्योजक, मोठंमोठ्याला कंपन्या जेंव्हा पण एखादे नवीन प्रॉडक्ट बनवत असतात तेंव्हा ते पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडने विचार करत असतात..
तुम्हाला काही उदाहरणे सांगतो, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल....
📌 मित्रांनो, एक पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या व्यक्तीने विमानाचा शोध लावला....विमानात बसून लोकं कमी वेळात लांबचा प्रवास करू शकतील....या उद्देशाने विमानाचा शोध लावला...✈️
👉 आता, निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांनी हे बघितले की, विमान तर आकाशात उडते...विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाली, विमान क्रॅश होतं असेल तर विमानात बसलेले लोकं खाली कसे उतरतील..
या उद्देशाने निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांनी हवेतून खाली उतरण्यासाठी parachute बनवले...🪂
📌 मित्रांनो, पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या एका माणसाने विचार केला की, लोकांनी स्वतःचे विचार एका कागदावर लिहायला हवे... त्यासाठी त्याने पेनचा शोध लावला...🖊️
परंतु निगेटिव्ह विचार करणाऱ्या माणसाने पेनाला पाहिले आणि विचार केला की, लोकांना पेन मिळाला तर ते काही पण लिहीत बसतील...
पेनाने लिहिलेले मिटण्यासाठी या निगेटिव्ह विचारधारकाने व्हाईटनेरचा शोध लावला व्हाईटनेर बनवले...
📌 एका पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या माणसाने पेन्सिलचा शोध लावला...तर,निगेटिव्ह विचार करणाऱ्या माणसाने खोड-रबरचा शोध लावला...
📌 देशाची आणि स्वतःची सुरक्षा करण्यासाठी पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या लोकांनी बंदूकांचा शोध लावला...
तर
निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांनी बंदूकीच्या गोळीपासून स्वतःचा व इतरांचा बचाव होईल यासाठी गोळी न लागणारे जॅकेट बनवले...
मित्रांनो, जगात असे खूप उदाहरणे आहेत, ज्यावरून आपल्याला स्पष्ट समजते की, पॉजिटीव्ह विचारांसारखे निगेटिव्ह विचार पण माणसाच्या कामी येतात...परंतु त्या निगेटिव्ह विचारांमध्ये इतरांचे भले व्हावे, या दृष्टीकोणातुन केलेला निगेटिव्ह विचार हा इतरांसाठी हानिकारक नसून फायदेशीर ठरतो...🤟
👉 मित्रांनो, 2025 मध्ये तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करत असाल परंतु कोणता नवीन व्यवसाय सुरु करू हेच तुम्हाला समजतं नसेल तर एकदा निगेटिव्ह विचार करून बघा, होऊ शकते तुमच्या डोक्यात एखादी नवीन आयडिया येईल...एखादी नवीन कल्पना सुचेल...
👉 आजच्या जगात सर्व व्यवसाय उपलब्ध आहेत... तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरु करायचा विचार करत असाल तर व्यवसाय सुरु करण्याआधी निगेटिव्ह आणि पॉजिटीव्ह दोन्ही गोष्टीचा विचार करा आणि नंतरच व्यवसाय सुरु करा...
मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback