KFC टेक्निक...

 


मित्रांनो, आज आपण KFC बद्दल माहिती पाहणार आहोत... KFC म्हणजे ते फ्राय चिकन वाला KFC नाही...हा KFC वेगळा आहे...😄


KFC म्हणजे...म्हणजे Known Find अँड Change 


📌 Known - जाणणे...

📌 Find - शोधा...

📌 Change - बदल...


Known जाणून घ्या -

👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय हवे आहे, ते व्यवस्थित आणि स्पष्ट जाणून घ्या...

Find शोधा -

👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात काय मिळत आहे ते शोधा... ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करत आहात ती गोष्ट तुम्हाला मिळतं आहे का?? ते शोधा...

Change बदल -

👉 मित्रांनो, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मेहनत करून सुद्धा मिळत नसतील तर कामामध्ये आणि स्वतःमध्ये थोडा बदल करा...

मित्रांनो, योग्य दिशेने मेहनत केल्यानंतरच हवे ते परिणाम मिळतं असतात...

तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही जर नागपूरच्या दिशेने जात असाल तर... तुम्ही योग्य ठिकाणी कधीच पोहचू शकणार नाही...

मित्रांनो, आज संध्याकाळी थोडा वेळ काढुन एकांतमध्ये बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की, आपल्या जीवनात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत....स्वतःचे ध्येय काय आहे, हे जाणून घ्या आणि निश्चित एक ध्येय ठरवा... एक वही पेन घ्या आणि त्यावर सर्व इच्छा लिहा...स्वतःचे ध्येय लिहा...आणि दररोज ठरवलेल्या ध्येयानुसार मेहनत करा, विचार करत रहा...

जसे की, 

👉 तुम्हाला जर पोलीस बनायचं असेल तर पोलीस बनण्यासाठी जी मेहनत करायची असते ती मेहनत मन लावुन करा...

प्रत्येक रविवारला स्वतःचे मूल्यमापन करा... स्वतःमध्ये काय काय बदल होतं आहे, हे तपासा... 

दर रविवारला सिंहावलोकन करा...मागच्या 7 दिवसामध्ये आपण काय काय केले यावर एक नजर टाका....रोज रात्री अथवा सकाळी 10/15 मिनिटे डोळे बंद करून Visualization करा...

👉 मित्रांनो, मेहनत करून तुम्हाला हवा तसा परिणाम मिळतं असेल तर ठीक आहे, परंतु पाहिजे तसा परिणाम मिळतं नसेल तर स्वतःमध्ये आणि कामामध्ये बदल करायला शिका....

उदाहरणार्थ :-

1) तुम्हाला जर एका आठवड्यामध्ये 3 किलो वजन कमी करायचे असेल आणि रोज तुम्ही 2 किलोमीटर धावुन सुद्धा तुमचं वजन कमी होतं नसेल तर पुढच्या आठवड्यापासून 3 किलोमीटर धावा...थोडक्यात कामामध्ये थोडा बदल करा...

तुम्हाला पाहिजे तसा परिणाम मिळतं नसेल तर कामामध्ये किंवा स्वतःमध्ये थोडा बदल करा...

👆👆 स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही KFC ही सोपी टेक्निक वापरू शकता, आणि स्वतःमध्ये बदल करू शकता...👍🏻👍🏻

मित्रांनो, आजचा हा छोटासा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...

धन्यवाद...🙏🏻🌹😇

✍️✍️ नरेंद्र दिपके

 ( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट