पॉजिटीव्ह विचारांची सुरुवात कशी करावी...?
पॉजिटीव्ह विचारांची सुरुवात कशी करावी...?
👉 मित्रांनो, एखादी व्यक्ती खुप बडबड करताना तुम्ही पाहिलेली असेल, परंतु तुम्ही असे सुद्धा काही लोक पाहिले असतील जे गप्प राहतात, आणि मनातल्या मनात बोलत असतात...
बडबड करणारे व्यक्ती आपले विचार हे हमेशा दुसऱ्याला सांगतात परंतु त्या विचारा प्रमाणे तो बडबड व्यक्ती कधीच काम करत नसतो...
कारण
त्याला एक वाईट सवय असते ती म्हणजे कोणताही व्यक्ती भेटला की त्याच्याशी बडबड करत राहायचं...किंवा लोकांना सांगायचं मी असे करेल, मी तसे करेल परंतु मी स्वतः काहीच करणार नाही. 😄
मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात खुप शांत आणि गप्प राहणारे व्यक्ती पाहिले असतीलच...
शांत राहणारे व्यक्ती हमेशा स्वतःशी बोलत असतात, आणि हमेशा शांत राहतात...
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती रोज स्वतःशी बोलत असतो.
आज कोणते महत्वाचे काम पूर्ण करायचे...?
आज कोणते पुस्तक वाचायचे...?
आज कोणता ड्रेस घालायचा...?
वैगरे वैगरे...
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती स्वतःशी बोलत असतो, बोलत असतो म्हणजेच तो विचार करत असतो...
विचार दोन प्रकारचे असतात...
1) पॉजिटीव्ह विचार 2) निगेटिव्ह विचार
मित्रानो, तुम्ही जर रोज पॉजिटीव्ह विचार करत असाल तर तुमच्यासोबत हमेशा पॉजिटीव्ह गोष्टीच घडतील...
तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत असाल तर तुमच्या सोबत हमेशा वाईट गोष्टीच घडतील...
त्यामुळे नेहमी पॉजिटीव्ह विचार करायला शिका...
मित्रांनो, एका माणसाला एका दिवसात 60000 हजार विचार येत असतात... त्या विचारामध्ये काही विचार पॉजिटीव्ह असतात तर काही विचार निगेटिव्ह असतात... आणि महत्वाचं म्हणजे आज तुम्ही जे विचार करता तेच विचार 98% दुसऱ्या दिवसी पुन्हा रिपीट होत असतात...
आज तुम्ही पॉजिटीव्ह विचार केला तर उद्या सुद्धा तुमच्या डोक्यात पॉजिटीव्ह विचारच येतील... 👍
मित्रांनो, येथे खुप लोकांना एक प्रश्न पडला असेल की, पॉजिटीव्ह विचारांची सुरुवात कशी करावी...?
मित्रांनो, सर्वात प्रथम एका कोऱ्या कागदावर तुमचे स्वप्न लिहा... नंतर त्या स्वप्न नुसार विचार करा... विचार करा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केलेले आहे...
तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा... आणि
रोज पुस्तके वाचा...
पुस्तके तुम्हाला हमेशा पॉजिटीव्ह विचार देतील आणि तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील....
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...
माणुस जसा विचार करतो, तसा तो बनत असतो...
त्यामुळे तुमचे विचार नेहमी पॉजिटीव्ह ठेवा, पॉजिटीव्ह विचारासाठी रोज पुस्तके वाचा...
मित्रांनो, पॉजिटीव्ह विचारांसाठी तुम्हाला काही टिप्स देत आहे.. त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...
1) रोज पुस्तके वाचा
👉 मित्रांनो, स्वतःला घढवायचे असेल तर पुस्तकासोबत मैत्री करा, पुस्तकामध्ये पॉजिटीव्ह विचार खुप असतात, तुम्हाला पुस्तके वाचण्याची सवय नसेल तर ती सवय आजपासून लावा.... रोज पुस्तकाचे 10 पेज वाचा... असे केल्याने तुम्ही एका महिन्यात एक पुस्तक वाचुन संपवाल... आणि तुमच्या मध्ये परिवर्तन लगेच दिसुन येईल...
2) चांगल्या मित्रांसोबत राहा...
👉 मित्रांनो, तुमचे मित्र कसे आहेत हे एकदा पाहा, तुमचे मित्र आणि तुम्ही रोज कोणत्या गोष्टीबद्दल चर्चा करता हे तपासा... तुमचे मित्र निगेटिव्ह विचारांचे असतील तर त्या मित्रांसोबत कमी राहा...
अशा मित्रांसोबत राहा जे रोज पुस्तके वाचत असतील आणि मोठ्या माणसाचा आदर करत असतील... 👍
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही पॉजिटीव्ह विचार करण्याऱ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करता तेंव्हा तुमच्या मित्रांचे विचार ऐकुन तुमचे विचार सुद्धा पॉजिटीव्ह होतील 👍
3) Youtube आणि TV
👉 मित्रांनो, आजकल तरुण मंडळीचा सर्वात जास्त वेळ हा सोशल मीडिया वर जाते...
फेसबुक असेल किंवा Youtube खुप मंडळी स्वतःचा किंमती वेळ फुकट वाया घालवतात... असो
मित्रांनो, तुम्ही सुद्धा Youtube वर सिरीयल पाहण्यात किंवा गाणे ऐकण्यात वेळ वाया घालवत असाल तर थोड सावध व्हा आणि तुम्ही कोणत्या सिरीयल पाहता किंवा कोणते गाणे ऐकता हे तपासा...
तुम्ही ज्या सिरीयल पाहता किंवा जे गाणे ऐकता तसेच विचार तुम्हाला येत असतात... त्यामुळे हमेशा चांगल्या सिरीयल पाहा
मित्रांनो, मी माझं एक उदाहरणं देतो...
मी रोज रात्री जेवण झाले की बाहेर फिरायला जातो... बाहेर फिरत असताना Youtube वरती श्री कृष्णाचे उपदेश ऐकत असतो... आणि फिरत असतो... थोडक्यात मी माझ्या वेळेचा भरपूर उपयोग करतो...
श्री भगवद गीता हे पुस्तक वाचायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही Youtube वरती श्री कृष्णाचे उपदेश नक्की पाहा...
चांगल्या गोष्टी पाहिल्याने चांगलेच विचार मनात येत असतात, त्यामुळे Youtube आणि फेसबुक वर आपण कोणत्या गोष्टी पाहतो ते पाहा आणि वाईट गोष्टी पाहणे आजपासूनच सोडुन द्या...👍
चांगले विचार, चांगले परिणाम देत असतात...
मित्रांनो, वरील सर्व टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...👍
मित्रांनो, तुम्ही Marathi Motivational Blog वर नवीन असाल तर पेजला नक्की Follow करा...
मित्रांनो, तुम्हाला तुमची Personality Develop करायची असेल तर आमचे वर्कशॉप नक्की जॉईन करा.. 👍
Time Management कोर्सची नवीन batch लवकरच सुरु होत आहे... तुम्ही कमी पैसामध्ये Time Management कोर्स शिकु शकता...
धन्यवाद... 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Khup Chaan Narendra
उत्तर द्याहटवामस्तच.. लेख आवडला..
उत्तर द्याहटवाKhup chan sar
उत्तर द्याहटवाMast👌👌
उत्तर द्याहटवा