स्वतःचे जीवन कसे बदलावे...?
स्वतःचे जीवन कसे बदलावे...?
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...
मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे का...?
तुमचे उत्तर हो असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे...
मित्रांनो, खुप विद्यार्थी किंवा खुप लोक यशस्वी लोकांना पाहुन ठरवतात कि मला सुद्धा त्या व्यक्ती सारखं बनायचं आहे... मला सुद्धा माझं जीवन बदलायचं आहे...
मित्रांनो, जेंव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला पाहुन त्या व्यक्ती सारखं बनायचा प्रयत्न करतो, तेंव्हा खुप साऱ्या गोष्टी आपल्या चुकत असतात... आणि आपल्या हातात नेहमी अपयश येत असते... यशस्वी झालेल्या व्यक्तीकडुन प्रेरणा घ्या परंतु त्या व्यक्तीची कॉपी करू नका...
मित्रांनो, आजच्या जगात 98% लोक दुसऱ्या सारखं बनायचा प्रयत्न करत आहेत... परंतु स्वतःच्या स्किल्स बद्दल कोणालाच माहिती नाही... प्रत्येक जण एकमेकांची कॉपी करत आहेत... आणि अपयशी होत आहेत...
मित्रांनो, तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे वाटतं असेल तर सर्वात प्रथम स्वतःला ओळखायला हवे...
मित्रांनो, स्वतःचे जीवन कसे बदलावे याबद्दल काही टिप्स देत आहे, त्या टिप्स वाचा आणि स्वतःचे जीवन बदला...
1) स्वतःला ओळखा / स्वीकारा
मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची पहिली पायरी म्हणजे स्वतःला स्वीकारणे
मित्रांनो, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा, खुप मुलं मुली स्वतःला सुंदर दिसण्यासाठी खुप क्रिम वैगरे लावतात... सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात परंतु खुप पैसे खर्च करून सुद्धा ते सुंदर दिसत नाही...
हे पाहा, देवाने सर्वांना सुंदर बनवल आहे... त्यामुळे दुसऱ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करू नका...
तुम्ही जसे असाल तसे स्वतःला स्वीकार करा...
तुम्ही काळे सावळे असाल किंवा तुम्ही तोतरे बोलत असाल, किंवा तुम्ही अपंग असाल.... तुम्ही जसे असाल तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा...
2) देवाकडे जे स्वतःसाठी मागता त्याहुन जास्त इतर लोकांसाठी मागा...
मित्रांनो, स्वतःचे जीवन तेंव्हाच सुंदर होईल जेंव्हा तुमचे विचार दुसऱ्यासाठी सुंदर पार्थना करतील...
मित्रांनो, तुम्ही देवाला गेल्या नंतर जे स्वतःसाठी देवाला मागता ते इतर लोकांसाठी सुद्धा मागा...
जेंव्हा तुम्ही सर्वांसाठी, दुसऱ्याव्यक्तीसाठी प्रेमाने आनंदाने काही तरी मागता तेंव्हा त्याच गोष्टी खुप प्रमाणात तुम्हाला मिळत असतात...
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती बद्दल तुमची ही भावना तुम्हाला नवीन विचार आणि प्रेम देतील आणि तुमचे जीवन बदलायला सुरुवात होईल...
3) सकरात्मक विचार करा.
स्वतःचे जीवन बदलण्यासाठी सकारात्मक विचार करणे खुप गरजेचे आहे...
मित्रांनो, तुम्ही खुप साऱ्या पुस्तकामध्ये किंवा लेखामध्ये सकारात्मक विचारानं बद्दल वाचले असेल... आणि तुम्ही सकारात्मक विचार करत सुद्धा असाल...
परंतु
सकारात्मक विचार स्वतः साठी तर करा परंतु सर्वांनसाठी सकारात्मक विचार करा...
लोक म्हणतात म्हणतात या जगामध्ये 98% लोक वाईट आहेत आणि 2% लोक चांगले आहे...
असा वाईट विचार करण्यापेक्षा चांगला विचार करा... जसे कि
या जगात 98% लोक चांगले आहेत आणि 2% लोक वाईट आहेत...
मित्रांनो, स्वतःचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार खुप पॉजिटीव्ह ठेवावे लागतील... निगेटिव्ह गोष्टी मध्ये सुद्धा तुम्हाला पॉजिटीव्ह गोष्टी दिसायला हव्या... 👍
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेंव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलता तेंव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला बदलेली दिसेल...
( एखाद्या प्रॉब्लेम मधुन तुम्हाला बिजनेसची आयडिया सुद्धा मिळु शकते... हे शक्य तेंव्हाच होईल जेंव्हा तुम्ही त्या प्रॉब्लेम मध्ये संधी शोधाल... )
मित्रांनो, रोज पॉजिटीव्ह विचार करण्याची सवय स्वतःला लावा...
4) जीवनाचे ध्येय ठरवा...
मित्रांनो, असे म्हणतात कि ज्या व्यक्तीचे काही स्वप्न नसते काही ध्येय नसते असे व्यक्ती अर्धे मेलेले असतात...
मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाचे ध्येय माहिती आहे का..?
प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनाचे ध्येय माहिती असायला हवे...
जीवनात ध्येय का पाहिजे हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरणं देतो म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येईल...
उदाहरणं :- मित्रांनो, विचार करा तुम्ही एका मोठ्या जहाजात बसलेले आहात आणि ती जहाज तुम्ही स्वतः चालवत आहात... परंतु तुम्हाला नकाशा माहिती नाही, तुम्हाला ती जहाज घेऊन कुठे जायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही....
मित्रांनो, आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या...
तुम्ही ती जहाज घेऊन कुठे जाणार,
तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे
तुम्ही आणि तुमची जहाज त्याच समुद्रात भटकत राहील आणि काही दिवसा नंतर ती जहाज त्या समुद्रात बुडून जाईल...
मित्रांनो, जीवन सुंदर होण्यासाठी जीवनात सुंदर ध्येय असणे खुप गरजेच आहे...
तुम्हाला तुमचे जीवन कसे जगायचे हे एका कागदावर लिहा आणि त्यानुसार कडक मेहनत करा...
तुम्ही तुमचे जीवन आणि तुमचे ध्येय नक्की प्राप्त कराल...
5) पुस्तके वाचा...
मित्रांनो, तुम्हाला 100 मित्र असतील तर एक मित्र अजुन Add करा... तो मित्र म्हणजे पुस्तक
रोज पुस्तके वाचण्यासाठी एक तास स्वतःला द्या... रोज 50 पेज पुस्तकाचे वाचा तुम्ही 7 दिवसात एक पुस्तक वाचुन संपवाल...
पुस्तके वाचुन तुम्ही तुमचे जीवन बदलु शकता.... पुस्तका सारखी शक्तिमान वस्तु या जगात दुसरी कोणतीच नाही...
पुस्तके वाचुन तुम्ही तुमचे ज्ञान वाढवु शकता, नवीन गोष्टी शिकु शकता..
पुस्तके तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा करतील त्यामुळे रोज पुस्तके वाचण्याची सवय स्वतःला लावा.
6) स्वतःचे काम स्वतः करा आणि वेळेवर करा...
मित्रांनो, मी आशा खुप लोकांना पाहिले जे स्वतःचे काम दुसऱ्याला करा लावतात...
हे पाहा Work Delegation करून तुम्ही तुमच्या वेळेची बचत करता हे योग्य आहे.
परंतु
जे सर्वात महत्वाचे काम आहेत ते स्वतः करा... स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय स्वतःला लावा... ऑफिसचे काम असतील किंवा घरचे काम
जे काम तुमचे असेल असे सर्व काम स्वतः करण्याची सवय स्वतःला लावा
7) नेहमी Gratitude राहा.
मित्रांनो, तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यासाठी देवाचे धन्यवाद करा...
रोज सकाळी, रोज रात्री देवाचे धन्यवाद करा...
तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यासाठी नेहमी Gratitude राहण्याची सवय स्वतःला लावा...
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या गोष्टीसाठी Gratitude राहता तेंव्हा तुमच्याजवळ ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत असतात... त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी Gratitude राहा... 👍
मित्रांनो, वरील सर्व टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...
मित्रांनो, आशा करतो की मी सांगितलेल्या टिप्स तुमचे जीवन नक्की बदलतील...
मित्रांनो, Marathi Motivational Blog वर तुम्ही नवीन असाल तर पेजला नक्की Follow करा... आणि लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना Share करा...
(मित्रांनो, तुम्हाला Time Management कोर्स शिकायचा असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा, किंवा Whatsapp वर MSG करा 9545441697 )
धन्यवाद 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Mast ekdam
उत्तर द्याहटवाVery important information for students & Parents.....
हटवाधन्यवाद... 🙏
उत्तर द्याहटवा👍👍
उत्तर द्याहटवाखूप छान वाटलं blog वाचून मी पण एक अपंग आहे मला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा