Passive Income चे मार्ग
Passive Income चे मार्ग
नमस्कार मित्रांनो, Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे...
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि Passive Income म्हणजे काय आणि Passive इनकमचे मार्ग कसे तयार करायचे... या साऱ्या गोष्टी आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत...
मित्रांनो, Passive Income जाणून घेण्या अगोदर आपण Active income काय असते याची माहिती घेऊया...
Active Income म्हणजे काय...?
👉 एखादे काम तुम्हाला स्वतः करावे लागते, स्वतःला मेहनत घ्यावी लागते आशा कामांमधून जे पैसे मिळतात त्याला Active Income म्हणतात..
उदा. शिक्षक, वकील, डॉक्टर यांना स्वतः हजर राहुन काम करावे लागते...
Passive Income म्हणजे काय...?
👉एकदा काम केल्यानंतर तुम्हाला परत कोणतेही काम न करता जे पैसे मिळतात त्याला Passive income म्हणतात..
उदा. Youtube, Blog, Apps, सॉफ्टवेअर, Books, रूम भाड्याने देणे... इत्यादी
मित्रांनो, आशा करतो कि Active income & Passive Income मधला फरक तुम्हाला समजला असेलच...
मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर Passive income चे मार्ग तयार करावेच लागतील... आणि या जगातले खुप लोक Passive Income च्या माध्यमातूनच श्रीमंत झालेले आहेत...
मित्रांनो, तुम्हाला पण Passive income चे मार्ग तयार करायचे असतील तर तुम्हाला एक वेळेस पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो, आणि नंतर तुमची Passive Income लाईफटाइम सुरु होते...
मित्रांनो, एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...
1) Facebook
👉 मित्रांनो, फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग हे आहेत... फेसबुक अँप तयार करण्यासाठी मार्क झुकरबर्ग यांनी खुप मेहनत केली... मेहनत आणि वेळ एकदाच खर्च केला परंतु त्यामधुन त्यांनी एक Passive Income चा मार्ग तयार केला..
मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक अँप तयार केली, लोक अँपचा उपयोग करतात, फेसबुक अँप वर खुप लोक स्वतःच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करतात त्या मार्केटिंगचे पैसे मार्क झुकरबर्ग यांना मिळतात...
मित्रांनो, आज मार्क झुकरबर्ग श्रीमंत लोकांच्या यादी मध्ये येतात त्याचे कारण म्हणजे त्यांनी passive income चा मार्ग तयार केला आहे...
2) Microsoft & Bill Gates
👉 Bill Gates यांनी सुद्धा स्वतः साठी पैसाचे झाड लावलेले आहे... आणि ते पैसाच झाड त्यांना रोज पैसे कमवुन देते..
Bill gates हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आहेत...
मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर बनवण्यासाठी त्यांनी सुद्धा खुप मेहनत घेतली आणि Passive income चा मार्ग तयार केला, जो त्यांना रोज घरी बसुन पैसे कमवुन देतो...
मित्रांनो, नवीन कॉम्पुटर मध्ये जे मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर आपण चालवतो त्याचे पैसे Bill Gates यांना मिळतात...
3) Amazon
👉 Amazon कंपनीचे मालक जेफ बेझोस हे आहेत...
मित्रांनो, तुम्हाला Amazon वेबसाईट बद्दल माहिती असेलच...
Amazon वर आपण आपले प्रॉडक्ट विकु शकतो आणि एखाद्या प्रॉडक्टची ऑर्डर देऊन ते आपण विकत घेऊ शकतो...
मित्रांनो, Amazon वेबसाईट वर खुप लोक स्वतःचे प्रॉडक्ट विकतात... त्या प्रॉडक्टवर 2% किंवा 3% कमिशन हे Amazone कंपनीचे असते...
मित्रांनो, जेफ बेझोस यांनी सुद्धा Passive income चा मार्ग तयार करण्यासाठी खुप मेहनत घेतली आणि स्वतःचा वेळ वेबसाईट बनवण्यासाठी इन्व्हेस्ट केला...
आणि त्यांनी तयार केलेल्या वेबसाईटने आज त्यांना जगातले सर्वात श्रीमंत बनवले आहे...
जेफ बेझोस हे Amazone वेबसाईट मार्फत रोज घरी बसुन करोडो रुपये कमवत आहेत...
मित्रांनो, वरील उदाहरणं वाचुन तुमच्या लक्षात आले असेल कि Passive income चे मार्ग तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला मेहनत आणि वेळ द्यावा लागतो... तेंव्हाच आपण स्वतः साठी Passive income चा मार्ग तयार करू शकतो...
मित्रांनो, Passive income चे फायदे... जेंव्हा आपल्याला Passive income चे फायदे कोणकोणते आहेत हे माहिती होतील तेंव्हाच आपण Passive income चे मार्ग तयार करू... चला मग पाहुयात Passive income चे फायदे
Passive Income चे फायदे
1) आपण काम न करता आपल्याला पैसे मिळतात...
2) Passive income असल्यामुळे आपल्याला 8 तास जॉब करण्याची गरज भासत नाही..
3) आपण आनंदी जीवन जगु शकतो..
4) आपल्या मर्जी प्रमाणे आपण फिरायला जाऊ शकतो, थोडक्यात आपला कोणी बॉस राहत नाही...
5) पैसाच टेंशन राहत नाही...
6) दिवसाचे 24 तास आपल्या हातात राहतात आणि आपण त्या 24 तासाचा उपयोग दुसऱ्या कामासाठी करू शकतो...
मित्रांनो, Passive Income चे खुप काही फायदे आहेत वरील उदाहरणं वाचुन तुमच्या लक्षात आले असेल कि Passive Income चे फायदे कोण कोणते आहेत...
मित्रांनो, आता पाहुयात आपण आपल्या मोबाईलचा उपयोग करून आणि रोज एक तासाचा उपयोग करून स्वतःचा Passive income चा मार्ग कसा तयार करू शकतो...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या... Passive income सुरु करण्यासाठी सर्वात अगोदर स्वतःला मेहनत घ्यावी लागते... स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो तेंव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता...
मोबाईलचा उपयोग करून आपण आपल्यासाठी Passive income चा मार्ग कशा तयार करू शकतो हे पाहुयात...
1) Youtube
👉मित्रांनो, Youtube चा उपयोग खुप लोक TimePass करण्यासाठी करतात तर कोणी Youtube चा उपयोग करून लाखो रुपये कमवतात...
मित्रांनो, तुम्ही Youtube मार्फत खुप सारे पैसे कमवु शकता...
मित्रांनो, स्वतःचे Youtube चॅनेल तयार करा... तुम्हाला ज्या क्षेत्रातले ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्या सोबत Share करा... 5 मिनिटचे व्हिडीओ तयार करा आणि Youtube वर अपलोड करा... थोडी मेहनत घ्या आणि थोडा वेळ Youtube ला द्या...
1 वर्षा नंतर तुमचे Youtube चॅनेल Google Add साठी अँप्रोव्ह होईल आणि तुमची Passive इनकम सुरु होईल... 👍
2) ब्लॉगिंग ( Blog )
👉 मित्रांनो, तुम्हाला वाचण्याची आणि लिखाणाची आवड असेल तर Blog लिहायला सुरुवात करा...
Blog म्हणजे स्वतःचे विचार लेखनाच्या स्वरूपात दुसऱ्यांसोबत share करायचे...
Blog वरून तुम्ही सुद्धा महिन्याला खुप पैसे कमवु शकता...
Blog तयार करा आणि रोज नवीन लेख लिहा 6 महिन्यानंतर तुमचे ब्लॉग पेज अँप्रोव्ह होईल Google Add साठी... आणि 6 महिण्यानंतर तुमची Passive income सुरु होईल.. 👍
3) पुस्तक लिहा...
👉 मित्रांनो, तुम्ही स्वतःचे एक पुस्तक लिहा आणि त्याला पब्लिश करा...
किंवा
Ebook तयार करा, त्या Ebook ला ऍमेझॉन किंवा प्ले स्टोरला टाका...
तुमचे Ebook लोक पाहतील आणि ज्यांना book घ्यायचे ते पैसे ट्रान्सफर करतील आणि Book विकत घेतील... तुम्हाला घरी बसुन पैसे मिळतील
पुस्तक लिहुन सुद्धा तुम्ही तुमचा Passive income चा मार्ग तयार करू शकता... 👍
4) नवीन अँप बनवा...
👉 मित्रांनो, तुमच्याकडे एखादी नवीन कल्पना असेल तर ती कल्पना अँप मध्ये convert करा...
Game ची अँप तुम्ही तयार करू शकता... किंवा चांगल्या विचाराची अँप बनवा किंवा सुविचारची अँप तयार करू शकता...
अँपसाठी थोडा खर्च येईल तो खर्च करा आणि थोडा वेळ द्या... ती अँप प्ले स्टोरला अपलोड करा...
लोक तुमची अँप पाहतील आणि ती अँप डाउनलोड करतील आणि Google Add च्या स्वरूपात तुम्हाला पैसे मिळणे सुरु होतील... आणि तुमची Passive income सुरु होईल...
मित्रांनो, वरील सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता... आणि Passive इनकमचे मार्ग तयार करू शकता... 👍
मित्रांनो, स्वतःचा Blog कसा तयार करावा & Blog कंटेंट कसे लिहावे... आणि खुप काही गोष्टी आपण 6 दिवसाच्या कोर्स मध्ये शिकणार आहोत...
मित्रांनो, तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर मला व्हाट्सअँपवर MSG करा... 9545441697
मित्रांनो, असेच मोटिवेशनल लेख वाचण्यासाठी Marathi Motivational Blog ला Follow करा... 👍
भेटूया पुढच्या लेखामध्ये... 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Best
उत्तर द्याहटवा