ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार...


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार... 

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog वर तुमचे स्वागत आहे.. 


मित्रांनो, आज दिनांक 03 जानेवारी 2022, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती... 


भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विन्रम अभिवादन. 💐💐🙏🙏💐💐


सावित्रीबाई फुले यांचा जन्म 

👉 मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्हातील नायगाव या गावी झाला.. 

सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते... 


1840 मध्ये सावित्रीबाई यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला...  विवाहच्या वेळेस सावित्रीबाई फुले यांचे वय नऊ होते, तर ज्योतिबा फुले यांचे वय बारा होते... 

महात्मा ज्योतिबा फुले स्वतः एक महान विचारवंत, समाजसुधारक, लेखक, संपादक आणि क्रांतिकारी होते... 

सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या, लग्नानंतर ज्योतिबानी त्यांना लिहायला, वाचायला शिकवले... 

नंतर याच सावित्रीबाईनी देशातील पहिल्या शिक्षक म्हणून गौरव प्राप्त केला.. 

मित्रांनो, त्या काळात चुल आणि मुल अशी एक परंपरा होती... मुलींना वाचन करण्याची लेखन करण्याची अजिबात परवानगी नव्हती... 

ही पद्धत मोडण्यासाठी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी खुप मेहनत घेतली आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली... 


शाळा सुरु केल्यानंतर त्या शाळेमध्ये स्वतः सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी जात असत. परंतु त्यांना लोकांच्या कडक विरोधाचा सामना करावा लागला.  जेंव्हा सावित्रीबाई शाळेत जात असतं तेंव्हा लोकांनी त्यांना शिवीगाळ केली,धर्माचे कंत्राटदार आणि स्त्री शिक्षणाचे विरोधी, कचरा गाळ आणि शेण त्यांच्यावर टाकत असत. यामुळे सावित्रीबाईचे कपडे खुप घाण व्हायचे, म्हणून त्या आणखी एक साडी आपल्याबरोबर आणायच्या आणि शाळेत आल्यावर ती बदलत असे, इतके असूनही त्यांनी हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य चालुच ठेवले.... 


मित्रांनो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज आपण त्यांचे प्रेरणादायी विचार वाचणार आहोत... त्यांच्या विचारातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल... 


1) अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत. 


2) शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री 


3) जर दगडाची पुजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते... 


4) माझ्या कविता वाचल्यावर जर  तुम्हाला थोडं जरी ज्ञान मिळालं तर माझे परिश्रम सार्थकी लागेल... 


5) तुम्ही बकरी, गाईला पाळता, नागपंचमीला नागाला दुध देता आणि दलितांना साधं माणुसही समजत नाही... 


6) शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा आहे 


7) तु तुझ्या स्वप्नाची कोमेजून देऊ नकोस फुले कारण तु तर आहेस शिक्षण घेणारी आणि देणारी पहिली महिला सावित्रीबाई  फुले 


स्त्री शिक्षणाचा शिल्पकार  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त विन्रम अभिवादन 🙏🙏💐💐🙏🙏


मित्रांनो,  Marathi Motivational Blog वरती तुम्ही नवीन असाल तर पेजला नक्की Follow करा... धन्यवाद 🙏🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट