आई वडिलांचा आदर करायला शिका...

आई वडिलांचा आदर करायला शिका... 


नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे... 


मित्रांनो, आजच्या जगात रोज कोणता न कोणता नवीन शोध लागत आहे... त्यामुळे माणसाचे जीवन सरळ आणि सोपे झालेले आहे...


मित्रांनो, आपण जर 50 वर्षा आधीचा काळ पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की, त्या काळामध्ये आधुनिक कोणतेच शोध लागलेले नव्हते... त्या काळात इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हता, कॉम्पुटर नव्हते... मिक्सर नव्हता, टीव्ही नव्हता... थोडक्यात सांगायचं म्हणजे अगोदरचा काळ खुप कठीण होता... 


परंतु 

आजच्या तारखेला माणसाने शिक्षणाचा उपयोग करून खुप मोठ मोठे शोध लावलेले आहेत...  


जसा की, मोबाईल 


मित्रांनो, जुन्याकाळात मोबाईल नव्हता प्रत्येक व्यक्ती पत्र लिहुन संवाद करत होता... 


मित्रांनो, आपण खुप नशीबवान आहोत की आपला जन्म 21 व्या शतकात झाला. 


आपल्यासाठी आज सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. मोबाईल,  कॉम्पुटर, इंटरनेट, आपल्याला पाहिजे त्या सर्व गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत... 


आपल्याला फक्त त्या साधनांचा उपयोग करून यशस्वी व्हायचं आहे... 


मित्रांनो, जुन्या काळात एक परिवार एक टेलिफोन मोबाईल होता, त्यामुळे मोबाईल बांधलेला होता आणि माणुस मोकळा होता... 

परंतु 

आज प्रत्येक व्यक्तीजवळ स्वतःचा एक मोबाईल आहे...त्यामुळे माणुस हा मोबाईलचा उपयोग करता करता मोबाईलचा गुलाम झालेला  आहे... आणि आळसी सुद्धा बनलेला आहे. 


काही लोकांना मोबाईलच एवढं व्यसन लागलेलं आहे की, आई बाबा सोबत बोलण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही... 

माणुस मोबाईलचा उपयोग करता करता मोबाईलचा पूर्ण गुलाम झालेला आहे... मोठ्या माणसाचा आदर कसा करतात हे सुद्धा आपण विसरून जात आहे... 


मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण आपल्या आई बाबांचा आदर कसा करावा, मोठ्या माणसाचा आदर कसा करावा याबद्दल काही टिप्स तुम्हाला देत आहे... त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...

1) आई बाबा समोर मोबाईल वापरू नका... 

👉 मित्रांनो, तुम्ही घरी असाल आणि तुमच्या समोर आई बाबा असतील तर त्यावेळी मोबाईल खिशात राहूद्या किंवा मोबाईल बाजूला ठेवुन द्या...  

तुम्ही जर तुमच्या आई बाबा समोर असतील आणि तुम्ही त्यांना बोलत नसाल आणि मोबाईल पाहत असाल तर त्यांना स्वतःचा अपमान झाल्या सारखं वाटु शकत... त्यामुळे आई बाबा समोर बसलेले असतील तर थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवा...


2) प्रत्येक कामात आई बाबांचा सल्ला नक्की घ्या... 

👉 मित्रांनो, तुम्हाला जे कोणते नवीन काम करायचं आहे ते अगोदर घरी सांगत जा... आई बाबा सोबत तुम्ही तुमचा प्लॅन Share करायला शिका... 

तुम्ही तयार केलेल्या प्लॅनवर आई बाबाचे काय मत आहे हे जाणून घ्या... आणि नंतर निर्णय घ्या.. 

आपण जोशात जोशात एखादी गोष्ट ठरवली तर ती पाहिजे तशी यशस्वी होणार नाही परंतु तुम्ही जर आई बाबाचा अनुभव उपयोगात आणला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता... 


3) लक्ष देऊन ऐका... 

👉 मित्रांनो, जेंव्हा पण आई बाबा तुमच्या सोबत बोलत असतील तेंव्हा त्यांचे बोलणे ध्यान धरून ऐका, लक्ष्यपूर्वक ऐका...  कधी कधी आपण आपल्या मूर्खपणामुळे महत्वाची गोष्ट ऐकत नाही आणि नंतर आपल्याला पच्यताप होतो... 

4) आई वडिलांचा उल्लेख नेहमीच आदरपूर्वक करावा... 

👉 मित्रांनो, मी असे खुप मुलं पाहिले जे त्यांच्या आई वडिलांना वाईट शब्द देऊन बोलतात... 

बाबाला म्हतारा बोलण्यापेक्षा बाबा बोला 

आईला म्हतारी बोलण्यापेक्षा आई अशी हाक मारा.. 

आई बाबाला आई बाबा या नावानेच हाक द्या... असे केल्याने तुमच्या आई वडिलांना तुमचा खुप आदर वाटेल...


5) मित्रांनो, लोकांच्या समोर नेहमीच आई वडिलांची तारीफ करायला शिका... आई बाबाची एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही, तरीही त्यांच्याबद्दल बाहेरच्या लोकांसमोर वाईट बोलु नका... 


6) आई वडिलांच्या चर्चेत सहभागी व्हा... ती चर्चा कोणती असो त्या चर्चेत सहभागी व्हा तुमचे मत मांडा, आणि आई बाबांच्या मतांचा सुद्धा आदर करायला शिका... 



7) आपल्याकडे काही चांगली बातमी असेल, तर ती आवर्जून सर्वात आधी आई वडिलांना सांगा... 


8) मित्रांनो, रोज रात्री थोडा वेळ काढा त्या वेळेमध्ये घरातील सर्वांना एकत्र करा आणि गप्पा गोष्टी करा... किंवा रोज कोणी न कोणी गोष्टी सांगायच्या बाकीच्यांनी चुपचाप गोष्ट ऐकायची किंवा गाणे बोलायचे किंवा एखाद्या विषयावर चर्चा करायची... असं एक नियोजन करा. 


असे केल्याने तुम्हाला खुप सकरात्मक ऊर्जा मिळेल आणि तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की तुम्ही रोज त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता, त्यांची काळजी घेता, 👍


मित्रांनो, वरील सर्व टिप्स खुप महत्वाच्या आहेत त्यामुळे लेख दोनदा वाचा आणि लेखामध्ये सांगितलेल्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागु करा... 


मित्रांनो, Marathi Motivational Blog वर तुम्ही नवीन असाल तर पेजला नक्की Follow करा... 👍

भेटूयात पुढ्यच्या लेखामध्ये... 

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट