राजा आणि हत्ती...

 

राजा आणि हत्तीची गोष्ट  

एका राजाजवळ एक हत्ती होता, राजाला तो हत्ती खुप प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसुन युद्ध केले तेंव्हा राजा नेहमी जिंकत असे.. 


काही वर्ष गेल्या नंतर हत्ती म्हतारा होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही, एके दिवसी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती त्या पाण्यात पुढे पुढे  गेला आणि चिखलात फसला. 


हत्तीला त्या चिखलामधुन बाहेर निघणे शक्यच नव्हते, त्यामुळे हत्ती जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकुन माहूत हत्तीकडे धावत गेला परंतु सरोवरातुन हत्तीला बाहेर काढणे कुणालाही जमेना, तेंव्हा त्यांनी हत्तीच्या  शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. 


कारण भाल्याच्या टोचण्याने हत्ती सर्व शक्ती लावुन पाण्याच्या बाहेर येणाचा प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, परंतु हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.  राजापर्यंत ही बातमी गेली राजाने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलवायला सांगितले, थोड्या वेळाने माहूत आला, आणि राजाला जाऊन भेटला 


जुन्या माहुताने राजाला एक सल्ला दिला, तो सल्ला म्हणजे असा की, महाराज तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा, राजाने त्या माहुताचे म्हणणे लगेच ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकूम दिला. मग काय थोड्या वेळाने जोर जोरात नगारे वाजू लागले... 


सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या त्याचबरोबर हत्तीच्या अंगात सुद्धा युद्धाची एक ताकद निर्माण होत होती. आणि त्या ताकदीमुळे हत्ती विसरून गेला की तो म्हातारा आणि चिखलात फसलेला आहे... 


हत्तीला वाटलं खरंच युद्ध होत आहे, त्यामुळे हत्तीने पुर्ण ताकदीने जोर लावला आणि सरोवरा बाहेर येऊन उभा राहला...  


त्या हत्तीचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि त्याला खुप मोठे बक्षीस दिले. 


तात्पर्य :- निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही, सकरात्मक विचारसरणी असल्यास कोणताही व्यक्ती त्याच्या जीवनात यशस्वी होऊ शकतो...


मित्रांनो, आजची प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल...  तर तुमच्या मित्रांसोबत गोष्ट नक्की Share करा... 

आणि  

Marathi Motivational Blog वर तुम्ही नवीन असाल तर ब्लॉग पेजला नक्की Follow करा... धन्यवाद 🙏 






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट