यशस्वी लोकांच्या पाच सवयी

 यशस्वी लोकांच्या पाच सवयी 


नमस्कार मित्रांनो, मित्रांनो Marathi Motivational Blog मध्ये तुमचे स्वागत आहे... 

मित्रांनो, यशस्वी लोकांमध्ये आणि अयशस्वी लोकांमध्ये फक्त एका गोष्टीचा फरक असतो तो म्हणजे त्यांच्या सवयी... 

यशस्वी लोकांना जेंव्हा पण रिकामा वेळ मिळतो तेंव्हा त्या वेळामध्ये वाचन करतात तर अयशस्वी लोकांना जेंव्हा पण रिकामा वेळ मिळतो तेंव्हा ते टीव्ही पाहण्यात वेळ वाया घालवतात.... 


मित्रांनो, तुमच्या चांगल्या सवयीवरूनच तुमचे भविष्य घडत असते, आणि चांगल्या सवयीमुळेच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होऊ शकता... 

मित्रांनो, तुम्हाला पण यशस्वी लोकांच्या यादीमध्ये यायचे असेल किंवा तुम्हाला पण तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला यशस्वी लोकांच्या सवयी स्वतःला लावाव्या लागतील... 


मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण यशस्वी लोकांच्या 5 सवयी पाहणार आहोत, त्या सवयी तुम्हीसुद्धा स्वतःला लावा आणि जीवनात यशस्वी व्हा... 


यशस्वी लोकांच्या पाच सवयी... 

1) रोज सकाळी लवकर उठा... 

👉 मित्रांनो, यशस्वी झालेल्या लोकांचा दिवस सकाळी 4 वाजतापासुन सुरु होतो, यशस्वी लोक रोज सकाळी 4 वाजता उठतात, आणि दिवसाची सुरुवात करतात... सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांच्याकडे एक्सट्रा वेळ मिळतो... 

तर 

अयशस्वी लोक सकाळी उशीरा उठतात आणि दिवसाची सुरुवात उशीरा करतात दिवसाची सुरुवात उशीरा केल्यामुळे त्यांच्याकडे वेळ कमी असतो त्यामुळे त्यांचे पूर्ण काम उशीरा होतात... 


मित्रांनो, तुम्ही जर रोज सकाळी 4 वाजता उठण्याची सवय लावाल तर एका वर्षात तुम्हाला 365 × 2 = 730 घंटे जास्त मिळतील... या एक्सट्रा वेळेचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात लवकर यशस्वी होऊ शकता... 👍

मित्रांनो, तुम्हाला पण यशस्वी व्हायचं असेल तर  रोज सकाळी 4 वाजता उठण्याची सवय स्वतःला लावा...


2) रोज सकाळी व्यायाम करा / मेडिटेशन करा 

👉 यशस्वी लोकांची दुसरी सवय म्हणजे रोज सकाळी व्यायाम करणे आणि मेडिटेशन करणे... 

सकाळी सुद्ध हवा खुप प्रमाणात असते, त्यामुळे रोज सकाळी व्यायाम करायला हवा, व्यायाम नंतर किमान 10 मिनिट मेडिटेशन करा... असे केल्याने तुम्हाला सुद्ध ऑक्सिजन मिळेल आणि तुमचे मन शांत होईल.. आणि तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहील...  व्यायाम आणि मेडिटेशनच्या सवयी मुळे तुम्हाला कोणतीच बिमारी लवकर होणार नाही... 

मित्रांनो, प्रत्येक यशस्वी माणुस रोज सकाळी व्यायाम करतो आणि मेडिटेशन करतो... तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी व्यायाम आणि मेडिटेशन करण्याची सवय स्वतःला लावा...


3) रोज पुस्तके वाचा... 

👉 मित्रांनो, प्रत्येक यशस्वी लोकांची एक सवय समान आहे ती म्हणजे रोज पुस्तके वाचणे... 

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स रोज पुस्तके वाचतात... 

ऍमेझॉन कंपनीचे मालक  जेफ बेझोस सुद्धा रोज पुस्तके वाचतात... 

टेसला कंपनीचे मालक इलॉन मस्क हे सुद्धा रोज पुस्तके वाचतात... 

वॉरेन बफे सुद्धा रोज पुस्तके वाचतात... 

मित्रांनो, या जगात जेवढे पण यशस्वी लोक आहेत, त्यांची एक सवय समान आहे ती म्हणजे रोज  पुस्तके वाचणे... 

पुस्तक वाचण्याचे खुप फायदे आहेत, पुस्तके वाचुन तुमचे विचार शुद्ध होतात, सकरात्मक विचार प्रेरणा मिळते... 

तुम्हाला पण यशस्वी लोकांच्या यादी मध्ये यायचं असेल तर रोज सकाळी पुस्तके वाचण्याची सवय स्वतःला लावा... 


4) रोज रात्री To Do List तयार करा 

👉 मित्रांनो, To Do List ही उद्याचा कामाची लिस्ट असते, कोणते काम कधी करायचे हे या To Do List मध्ये लिहीत असतात... आणि त्यानुसार काम करत असतात 

To Do List मध्ये तीन कॉलोम असतात 

A मध्ये तुम्ही महत्वाचे कामे  लिहा. 

B मध्ये तुम्ही कमी महत्वाचे कामे लिहा.

C मध्ये सर्वात कमी महत्वाचे कामे लिहा.

ही To Do List रोज रात्री झोपण्या आधी तयार करा...आणि दुसऱ्या दिवसी या To Do List नुसार कामाला लागा... 

सर्वात प्रथम A मधले सर्व काम पुर्ण करा नंतर B आणि नंतर C 

याप्रमाणे तुम्ही तुमचे सर्व महत्वाचे कामे पूर्ण करू शकता... 

प्रत्येक यशस्वी व्यक्ती To Do List नुसारच काम करत असतो... 

To Do List मुळे तुमच्या वेळेची बचत सुद्धा होते...

मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर रोज रात्री To Do List तयार करा.. 

( मित्रांनो, To Do List हा Time Management चा एक पार्ट आहे... तुम्हाला Time Management कोर्स शिकायचा असेल तर मला Whatsapp करा...   Time Management कोर्सचे नवीन Batch लवकरच सुरु होत आहे... )


5) सकरात्मक दृष्टीकोन 

👉 मित्रांनो, यशस्वी लोकांच्या मते, केवळ सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.. 

परंतु सकरात्मक दृष्टीकोन हे यशस्वी होण्याच्या मूळ कारणांपैकी एक आहे... 

कोणतेही काम करताना सकरात्मक दृष्टीकोन असणे खुप गरजेचे आहे... कारण तुमचा जसा दृष्टीकोन असेल तसाच तुम्हाला परिणाम मिळत असतो... 

सकरात्मक दृष्टीकोन असणारा व्यक्ती प्रत्येक समस्याकडे सकरात्मक नजरेने पाहतात... त्यामुळे त्याना समस्या मध्ये सुद्धा संधी दिसुन येतात... हाच सकरात्मक दृष्टीकोनाचा खुप मोठा फायदा आहे... 

मित्रांनो, सकरात्मक दृष्टीकोन बाळगून तुम्ही तुमचे जीवन बदलु शकता. आनंदी जीवन जगु शकता. 👍


पॉजिटीव्ह अटीट्युड... हा लेख नक्की वाचा या लेखामध्ये तुम्हाला पॉजिटीव्ह अटीट्युड बद्दल सर्व माहिती मिळेल... 👍


मित्रांनो, वरील सर्व  सवयी  वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा... आणि स्वतःचे जीवन बदला 

मित्रांनो, Marathi Motivational Blog या पेजवर तुम्ही नवीन असाल तर पेजला नक्की Follow करा. 👍

भेटूयात पुढच्या लेखात... 


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट