प्रेरणा.... ( Motivation )

 


प्रेरणा... 

मित्रांनो, आपण स्वतःला motivate ठेवण्यासाठी motivate राहण्यासाठी खुप सारे मोटिवेशनल व्हिडिओ पाहत असतो... Book वाचत असतो... 


 जेंव्हा आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो तेंव्हा आपल्या अंगात एक सकरात्मक ऊर्जा निर्माण होते... नंतर आपण कोणतेही काम करायला लगेच तयार होतो... 

परंतु 

तीन चार दिवसानंतर आपण पुन्हा जैसे ते वैसे होतो....


मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि प्रेरणा येते कुठून आणि प्रेरणा कशी मिळते...?

मित्रांनो, मोटिवेशनला मराठी मध्ये प्रेरणा म्हणतात.... 


👉 आजकल प्रेरणा घेण्यासाठी आपण Youtube चा भरपूर उपयोग करतो... आणि त्या व्हिडिओ मधुन सुद्धा आपल्याला  प्रेरणा मिळते.... परंतु आजकल प्रेरणा देणारे व्हिडीओ कोणी पाहत नाही.... त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जसा आहे तसाच  राहतो... 


मित्रांनो, जेंव्हा एक लहान मुलगा  जन्म घेतो तेव्हा तो पूर्ण पणे अज्ञान असतो.... जसा जसा तो लहानसा मोठा होतो तेंव्हा तो प्रत्येक गोष्टीला पाहुन, ऐकून शिकत असतो... आणि त्याच्या जीवनाची पहिली प्रेरणादायी जी व्यक्ती असते ती त्याची आई असते... 

आई लहान मुलाला प्रेरणादायी गोष्टी सांगते, लहान मुलगा त्या गोष्टी ऐकतो आणि तसेच वागायला सुरुवात करतो... 


मित्रांनो, जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज लहान होते तेंव्हा त्यांची आई म्हणजे जिजामाता 

जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांना राम, कृष्णाच्या, राजा महाराजांच्या,  गोष्टी सांगत त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांना खुप  प्रेरणा मिळत होती... 



मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा... 

आजच्या जगात जे व्यक्ती यशस्वी झालेले आहेत, ते त्यांच्या मेहनतीमुळे यशस्वी झालेले आहेत... तुम्ही जर अजुन बोलत असाल कि यशस्वी झालेले लोकांचे नशीब चांगले होते म्हणुन ते यशस्वी झाले असा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात...


मित्रांनो, तुम्ही जर पॉजिटीव्ह Mindset ने विचार केला किंवा पॉजिटीव्ह Mindset ने या जगाकडे पाहिले तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमधुन प्रेरणा घेऊ शकता... आणि स्वतःचे जीवन बदलु शकता...  


मित्रांनो, मी माझे उदाहरणं देतो, सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा मला एका लहान मुलाकडून मिळाली..   

👉 जेंव्हा मी 20 वर्षाचा होतो तेंव्हा मी झोपेतून रोज उशीरा उठत होतो... 

रोज रात्री झोपताना अलार्म लावत होतो आणि सकाळी अलार्म वाजला कि अलार्म बंद करायचो आणि पुन्हा झोपायचा... 😄

परंतु 

एक दिवस माझ्यासोबत एक चमत्कार झाला तो म्हणजे असा कि, 

आमच्या शेजारी एक मुस्लिम परिवार राहतो... त्यांच्या घरामध्ये एक लहान मुलगा आहे,  त्याचे नाव फारूक आहे. 

फारूक हा 6 th क्लास मध्ये शिकत होता

एक दिवस फारूक आमच्या घरी आला  आणि मी मजाक मध्ये त्याला विचारले तु सकाळी किती वाजता उठतोस... 

त्याचे उत्तर होते मी रोज सकाळी मी 4 वाजता उठतो, सकाळी अंघोळ करतो आणि 5 वाजता नमाज पडायला मशीद मध्ये जातो... 

मित्रांनो, त्याचे उत्तर ऐकून मी खुप हैराण झालो..  

मी स्वतःला बोलो कि हा लहान मुलगा रोज सकाळी 4 वाजता उठतो, सकाळी अंघोळ करतो, नंतर नमाज पडायला जातो... 

आणि मी रोज सकाळी 5 वाजताचा अलार्म लावतो आणि अलार्म बंद करून पुन्हा झोपतो... 



मित्रांनो, त्या लहान मुलाकडून मला खुप खुप प्रेरणा मिळाली आणि दुसऱ्या दिवसी मी अलार्म लावला आणि सकाळी लवकर उठलो आणि व्यायाम करायला गेलो... 

मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असे आहे कि, तुम्ही प्रत्येक  लहान व्यक्तीकडून सुद्धा प्रेरणा घेऊ शकता... स्वतःला शिकवु शकता, स्वतःला हमेशा सांगा तो व्यक्ती यशस्वी होऊ शकतो तर मी सुद्धा यशस्वी  होऊ शकतो... 👍

मित्रांनो, जेंव्हा आपण पाहतो कि, आपल्या सारखा व्यक्ती आपल्या पुढे जात आहे... तर त्या व्यक्तीकडून प्रेरणा घ्याला शिका... स्वतःला सांगा मी सुद्धा यशस्वी होणार म्हणजे यशस्वी होणार... 

मित्रांनो, जेंव्हा तुम्ही यशस्वी झालेल्या लोकांचा अभ्यास कराल तेंव्हा तुमच्या लक्षात येईल कि प्रत्येक यशस्वी व्यक्तीला पुस्तके वाचण्याची सवय असते... आता तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी लोकांच्या सवयी लावा... आणि यशस्वी व्हा... 👍

मित्रांनो, लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती ती गोष्ट तुमच्याशी share करत आहे... 



👉मित्रांनो, एका गावात एक राजु नावाचा व्यक्ती राहत होता... तो खुप गरीब होता, त्याच्या जीवनात खुप खुप समस्या येतच राहत... 

तरी सुद्धा तो रोज शेतात जात शेतातले काम करत आणि घरी येत... शेतात खुप काम करून सुद्धा शेतात पाहिजे तसे उत्पन्न होत नसे त्यामुळे तो खुप खुप परेशान झाला आणि आत्महत्या करायला जंगलात गेला.... 

राजू जंगलात गेल्यावर एका मोठ्या झाडाखाली बसतो आणि अचानकच त्याची नजर एका मुंगी वर जाते... 

मुंगी झाडावर चढायचा प्रयत्न करत होती आणि पुन्हा खाली पडायची... असे खुप वेळा झाले... आणि शेवटी ती मुंगी झाडावर चढते...

हे पाहुन राजू विचार करतो, कि मुंगी खुप वेळा खाली पडून सुद्धा जिंकु शकते तर मी का नाही जिंकु शकत... 

राजू त्या मुंगी मधुन खुप प्रेरणा घेतो आणि घरी येतो.... खुप खुप मेहनत घेतो आणि स्वतःचे जीवन बदलतो... 👍


मित्रांनो, गोष्टीचे तात्पर्य असे आहे कि तुमचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी किती हि समस्या आल्या तरी सुद्धा मेहनत करणे सुरु ठेवा तुम्हाला एक दिवस यश नक्की मिळेल... 👍

मित्रांनो, या जगात जेवढे पण यशस्वी लोक आहेत ते एका कारणामुळे यशस्वी झाले आहेत ते म्हणजे प्रेरणा 

मित्रांनो, तुमचे जे कोणते Goal असेल ते Goal अगोदर कोणी प्राप्त केले ते पहा आणि त्या व्यक्तीचे पुस्तके वाचा किंवा Youtube ला InterView पहा.... तुम्हाला खुप प्रेरणा मिळेल आणि तुम्ही तुमचे स्वप्न लवकर प्राप्त करू शकाल... 👍

मित्रांनो, लेख आवडला असेल तर नक्की Share करा आणि प्रेरणा बद्दल तुमचे काय विचार आहेत ते नक्की comments करा... 👍


✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट