Positive Attitude..
* सकरात्मक दृष्टिकोन * मित्रांनो, आपण आपल्या जीवनात किंवा आपल्या कामात यशस्वी होऊ कि अयशस्वी होऊ हे आपला दृष्टीकोन ठरवत असतो... सकरात्मक दृष्टीकोनाला इंग्लिश मध्ये Positive Attitude म्हणतात... मित्रांनो, सकरात्मक दृष्टीकोन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्या अगोदर आपण दृष्टी आणि दृष्टीकोन यामधला फरक समजून घेऊया... 👉 दृष्टीकोन बद्दल खुप लोकांचा एक गैरसमज असतो तो म्हणजे ज्या गोष्टी ते लोक पाहतात त्यालाच दृष्टीकोन समजतात... मित्रांनो, जिथंपर्यँत तुमची दृष्टी पोहचत असते, तो तुमचा दृष्टीकोन नसतो, तर ते फक्त तुमचे पाहणे असते, यालाच दृष्टी म्हणतात... तुम्हाला दिसणाऱ्या वस्तूकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता, तो तुमचा दृष्टीकोन असतो.. 👉 मित्रांनो, तुम्ही एखादे काम करण्यापूर्वीच ते काम यशस्वी झाल्याचे पाहत असाल, तर तो तो तुमचा सकरात्मक दृष्टीकोन असतो... तसेच एखादे काम सुरु करण्यापूर्वीच ते काम अयशस्वी झाल्याचे जर तुम्ही पाहत असाल किंवा तसा विचार करत असाल, तर तो तुमचा नकरात्मक दृष्टीकोन असतो... 👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि,...