Communicate Well and Respect Everyone
मित्रांनो, माणसात आणि जनावरा मध्ये फक्त एका गोष्टीचा फरक आहे... तो म्हणजे माणुस बोलु शकतो आणि जनावर बोलु शकत नाही...
👉 मित्रांनो, माणुस जेंव्हा जन्म घेतो तेंव्हा त्याला खुप साऱ्या शक्ती गिफ्ट मध्ये मिळतात... परंतु माणुस त्याच्या जवळ असलेल्या शक्तीचा उपयोग चांगल्या कामासाठी कधीच करत नाही...
उदा, माणुस पाहु शकतो परंतु माणुस चांगल्या गोष्टी कधीच पाहणार नाही...
माणुस बोलु शकतो परंतु दुसऱ्याला प्रेम आणि आनंद मिळेल असे तो कधी बोलत नाही आणि वागत सुद्धा नाही...
माणुस ऐकु शकतो परंतु दुसऱ्याचे कधीच ऐकणार नाही आणि चांगल्या गोष्टी तर अजिबात ऐकणार नाही...
👉 मित्रांनो, माणसाने जर एक सवय स्वतःला लावुन घेतली तर तो त्याच्या जीवनात आणि त्याच्या कामात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, ती सवय म्हणजे *प्रेमळ संवाद* करणे
आदरणीय, राष्टपिता महात्मा गांधीजी यांच्या जवळ शस्त्र होते असे तुम्ही कधी ऐकले का...? नाही ना
महात्मा गांधीजी जवळ फक्त एक गोष्ट होती ती म्हणजे प्रेमळ संवाद करण्याची
तुम्ही मदर टेरेसा ला ओळखता का...?
सर्व जग मदर टेरेसा यांना ओळखते का तर त्यांच्या संवाद वरून आणि त्याच्या चांगल्या कामावरून
👉 मित्रांनो, या जगात लाखो उदाहरणं आहेत की ते फक्त आणि फक्त संवाद करून यशस्वी झालेले आहेत आणि खुप सारे प्रॉब्लेम संवाद करूनच Solve केलेले आहेत...
मित्रांनो, आता तुमच्या लक्ष्यात आले असेलच की चांगले संवाद करणे किती महत्वाचं आहे...
* चांगला संवाद करा आणि प्रत्येकाची रिस्पेक्ट करा... *
1) समोरच्या व्यक्तीला महत्वपुर्ण समजा
👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी खुप महत्वाचा असतो... आपण किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी तो कार विकत घेतो, चांगले कपडे विकत घेतो, ह्या साऱ्या गोष्टी तो फक्त आपण किती मौल्यवान आणि महत्वाचे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो...
_माणसाचा स्वभाव खरंच आगळा वेगळा आहे_
_माणसाला जनावर म्हंटल तर राग येतो आणि वाघ म्हंटल तर आनंद मिळतो... खरे पाहता वाघ सुद्धा जनावरच आहे_
मित्रांनो, तुम्ही रोज ज्या व्यक्तीला भेटत असाल त्यांना महत्वपूर्ण समजा त्याला रिस्पेक्ट द्या तुम्ही दुकानदार असाल किंवा विद्यार्थी तुम्ही रोज ज्या व्यक्तीला भेटता त्यांना महत्वपुर्ण समजा आणि त्याची रिस्पेक्ट करा... आणि हसत बोला
उदा, तुम्ही अभ्यास करत आहात आणि एखादा व्यक्ती जोरात गाणं वाजवत असेल तर तुम्ही त्याला हसत आणि प्रेमाने बोला.. बाळा मी अभ्यास करत आहे प्लीज बाहेर जाऊन गाणे ऐक... किंवा थोड्या वेळाने गाणे ऐक
जेंव्हा तुम्ही प्रेमाने आणि हसून बोलाल तेंव्हा समोरचा व्यक्ती सुद्धा तुमच काम ऐकत असतो...
तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व मित्रांना हसुन बोला प्रत्येकाची रिस्पेक्ट करा... समोरच्या व्यक्तीची ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टी बद्दल बोला... किंवा समोरच्या व्यक्तीच्या कामाबद्दल प्रशंसा करा..
मित्रांनो, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरात कोणी चांगले काम केले तर त्याला शाबासकी द्या... एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्याला पुष्पगुछ देऊन शुभेच्छा द्या...
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्राची रिस्पेक्ट कराल तेंव्हाच तुमचा मित्र सुद्धा तुमची रिस्पेक्ट करेल हे ध्यानात ठेवा... आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोला... तुमचे जीवन नक्की बदलेल... 👍
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback