दिवसाची सुरुवात कशी करावी...?
👉 मित्रांनो, तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता...?
खुप सारे लोक सकाळी झोपेतून उठले कि पुर्ण गावाचं टेन्शन घेतात 😄
मोबाईल पाहतात... कोणाचे msg आले.... माझे Whatsapp स्टेटस कोणी कोणी पाहिले... गर्लफ्रेंड ने रिप्लाय दिला कि नाही... आणि नसेल दिला तर अजुन टेन्शन 😄
👉 तसेच मिनिमम लोक झोपेतून उठले कि News पाहायला सुरुवात करतात...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा - दिवसाची सुरुवात ज्या प्रमाणे होते त्याच प्रमाणे आपला पुर्ण दिवस जात असतो...
👉 तुम्ही सकाळी उठून मोबाईल पाहता किंवा News पाहता त्यामधून आपल्याला फक्त निगेटिव्ह गोष्टी मिळतात मनामध्ये निगेटिव्ह भावना निर्माण होतात... रात्री तिकडे खून झाला, दोन कारचा अकॅसिडेन्ट झाला, बलात्कार झाला... अशा News पाहुन माणसाला दुःख होते मनामध्ये वाईट भावना निर्माण होतात वाईट विचार मनामध्ये येत असतात...
( तुम्ही news अजिबात पाहुच नका असे माझं मनने नाही...तुम्ही News पहा परंतु सकाळी सकाळी News पाहु नका.. )
👉 मित्रांनो, आता विचार करा दिवसाची सुरुवात जर निगेटिव्ह गोष्टी पासुन झाली तर तुमचा पुर्ण दिवस कसा जाईल... तुमचा पूर्ण दिवस निगेटिव्हच जाईल...
मित्रांनो, दिवसाची सुरुवात चांगली होणे खुप खुप गरजेचे आहे आणि आजच्या लेख मध्ये आपण शिकणार आहोत कि दिवसाची सुरुवात कशी करावी..
मित्रांनो, रोज सकाळी तुम्ही झोपेतून उठले कि मोबाईल वरचे स्टेटस पाहता ना तर उद्यापासून असं करायच नाही....
मोबाईल पाहायचा परंतु मोबाईल मध्ये सकारात्मक भावना, मन प्रसन्न करणारे गाणे ऐकायचे आहेत... नंतर तुम्ही सर्व काम ऑटोमॅटिक चांगले कराल...
मी तुम्हाला दोन किंवा तीन गाण्याचे नाव सांगतो ते गाणे ऐका रोज सकाळी ऐका तुमचे मन खुप खुप प्रसन्न होईल... तुमच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतील आणि तुमचा सर्व दिवस आंनदी जाईल, दिवसभर तुमच्या मनात सकरात्मक विचार येतील
सकाळचे गाणे...
1) इतनी शक्ति हमें देना दाता
2) सत्यम शिवम सुंदरम
3) या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
4) भक्ती गीत
5) तुम्ही ज्या देवावर श्रद्धा ठेवता त्या देवाचे गाणे ऐका
असे खुप गाणे आहेत ते गाणे ऐकून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता...👍
व्यायाम करताना सुद्धा तुम्ही हे गाणे ऐकु शकता... 🤷♂️
मित्रांनो, हा लेख वाचल्यानंतर मी सांगितलेले गाणे एकदा ऐका नंतर पहा तुमचे टेन्शन तुमचे दुःख दुर होईल आणि तुम्ही प्रसन्न व्हाल, आनंदी व्हाल...
( हा लेख त्या लोकांनसाठी आहे जे सकाळी तर लवकर उठतात परंतु गोधडी अंगावर घेतात आणि मोबाईल पाहत बसतात...😄 )
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Mast👌👌
उत्तर द्याहटवा