प्रेरणा.... ( Motivation )
प्रेरणा... मित्रांनो, आपण स्वतःला motivate ठेवण्यासाठी motivate राहण्यासाठी खुप सारे मोटिवेशनल व्हिडिओ पाहत असतो... Book वाचत असतो... जेंव्हा आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो तेंव्हा आपल्या अंगात एक सकरात्मक ऊर्जा निर्माण होते... नंतर आपण कोणतेही काम करायला लगेच तयार होतो... परंतु तीन चार दिवसानंतर आपण पुन्हा जैसे ते वैसे होतो.... मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि प्रेरणा येते कुठून आणि प्रेरणा कशी मिळते...? मित्रांनो, मोटिवेशनला मराठी मध्ये प्रेरणा म्हणतात.... 👉 आजकल प्रेरणा घेण्यासाठी आपण Youtube चा भरपूर उपयोग करतो... आणि त्या व्हिडिओ मधुन सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते.... परंतु आजकल प्रेरणा देणारे व्हिडीओ कोणी पाहत नाही.... त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जसा आहे तसाच राहतो... मित्रांनो, जेंव्हा एक लहान मुलगा जन्म घेतो तेव्हा तो पूर्ण पणे अज्ञान असतो.... जसा जसा तो लहानसा मोठा होतो तेंव्हा तो प्रत्येक गोष्टीला पाहुन, ऐकून शिकत असतो... आणि त्याच्या जीवनाची पहिली प्रेरणादायी जी व्यक्ती असते ती त्याची आई असते......