आळस कसा दूर करावा... ( आळस आणि उपाय )
मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या मला सांगा एखाद्या परीक्षा मध्ये जर आपल्याला पास व्हायचं असेल तर काय करावे लागेल...?
निरोगी राहण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल...?
पैसे जमा करायचे असतील किंवा पैसे कमवायचे असतील तर काय करायला पाहिजे...?
यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे...?
स्वतःला Motivate राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे...?
मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, कोणती गोष्ट केल्याने फायदा आहे आणि कोणती गोष्ट न केल्याने फायदा आहे...
मित्रांनो, प्रत्येकाला माहिती आहे रोज सकाळी लवकर उठुन व्यायाम केला तर आपण निरोगी राहु परंतु किती लोक सकाळी लवकर उठतात...
प्रत्येकाला माहिती आहे, वेळेचे नियोजन केले आणि थोडा वेळ अभ्यास केला तर आपण प्रत्येक परीक्षा पास करू शकतो.... परंतु किती लोक वेळेचे नियोजन करतात... किती लोक रोज अभ्यास करतात..?
मित्रांनो, माझे खुप मित्र मंडळ, विद्यार्थी मित्र, रोज Whatsapp ला स्टेटस ठेवतात, स्टेटस छान असते, त्यांनी ठेवलेले स्टेट्स मोटिवेशनल असते... परंतु त्यांनी जसे सुंदर स्टेटस ठेवले तसे ते काम करतात का...? अजिबात करत नाही
मित्रांनो, आजच्या तारखेला प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे... परंतु व्यक्ती तसा वागत नाही...
👉 Youtube ला हजारो मोटिवेशनल व्हिडीओ आहेत... लोक ते मोटिवेशनल व्हिडीओ अजिबात पाहणार नाही परंतु फालतु गोष्टी नक्की ऐकतील...
मित्रांनो, एक विचार करा... प्रत्येक चांगली गोष्ट प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी का होत नाही....?
मित्रांनो, यशस्वी न होण्याचे एक कारण आहे ते म्हणजे आळस
मित्रांनो, एक विचार करा,
70 वर्षा आधी पहिले लोक एका जागेवरून दुसरीकडे पैदल जात असे... एखादी माहिती मिळवण्यासाठी त्यांच्याकडे इंटरनेट नव्हते.... तरी सुद्धा ते लोक प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करत होते... वेळेवर झोपेतून उठत असे....
👉 मित्रांनो, आजच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे, इंटरनेट आहे, गाडी आहे, सर्व गोष्टी उपलब्ध आहे... तरी सुद्धा आपल्याकडे एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ मिळत नाही आणि कोणतेच काम वेळेवर पूर्ण करत नाही.. थोडक्यात काय तर आपण सर्वजण खुप आळसी होत आहे...
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि, आळस का येतो, आणि आळस दुर करण्याचे उपाय कोणते आहे...
* आळस *
👉 मित्रांनो, एका संशोधना मधुन असे आढळून आले कि प्रत्येक व्यक्ती त्याच्या आळसी पणामुळे रोजचे 5 तास वाया घालवतो... याच 5 तासाचा उपयोग जर माणसाने त्याचा कामासाठी, त्याच्या प्रगतीसाठी उपयोग केला तर तो सुद्धा यशस्वी होऊ शकतो...
मित्रांनो, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा...
👉 आपले मन हे हमेशा आराम मिळवण्यासाठी धडपड करत असते... जिथे कष्ट करावे लागतात असे काम आपले मन टाळत असते...
उदाहरणं, रोज एक तास पुस्तके वाचायचे... आता हे काम खरोखर खुप अवघड आहे... आता हे काम करताना तुमचे मन तुम्हाला सांगेन एक तास पुस्तके वाचण्या पेक्षा एक तास आपण व्हिडीओ game खेळु... आणि तुम्ही पुस्तक वाचण्याचे टाळता...
मित्रांनो, आपण जर आपल्या मनाला चालना दिली तर आपले प्रत्येक काम आपले मन नक्की करेल...
उदाहरणं, पुस्तके वाचल्यामुळे आपण सर्वात हुशार होऊ... किंवा
पुस्तके वाचल्यामुळे आपण जास्त मार्क मिळु शकतो... असे स्वतःला सांगा आणि नंतर पुस्तके वाचा तुम्हाला छान परिणाम मिळेल...
मित्रांनो आता पाहुयात आळस येण्याचे मुख्य कारण कोणकोणते आहे... आणि उपाय
1) ठळक ध्येय नसणे...
👉 समजा तुम्हाला एका गावाला जायचं आहे परंतु कोणत्या गावाला जायाचं हेच तुम्हाला माहिती नसेल तर काय होईल...?
मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि, जो व्यक्ती स्वतःचे ध्येय ठरवत नाही, ज्या व्यक्तीला स्वतःचे ध्येय माहिती नाही, असे लोक खुप आळसी असतात...
मित्रांनो, या पृथ्वीवर फक्त 3 % लोक असे असतात ज्यांचे ठळक ध्येय असतात, मोठे ध्येय असतात असे लोक जीवनात नक्कीच यशस्वी होतात...
आणि 97% लोकांचे ध्येय हे साधारण असते त्यामुळे ते लोक साधारण जीवन जगतात...
2) आवडीचे काम नसणे...
👉 मित्रांनो, आळस येण्याचे दुसरे कारण म्हणजे आपल्या आवडीचे काम नसणे...
समजा, तुमच्या मित्राला क्रिकेट गेम खुप आवडतो आणि तुम्ही त्याला खो - खो बद्दल माहिती देत आहात तर काय होईल...
तुमचा मित्र तुमच्याशी चर्चा करताना बोर होईल आणि तेथून निघून जाईल...
मित्रांनो, जे काम तुम्हाला आवडत नाही ते काम तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला आळस येईल... त्यामुळे कोणताही जॉब करत असताना ते काम तुमच्या आवडीचे आहे का ते पहा आणि नंतर जॉब करा
किंवा
तुम्ही जे काम करता त्यामध्ये आवड निर्माण करा... आवड निर्माण केल्यामुळे तुम्हाला ते काम करताना आळस अजिबात येणार नाही...
3) Deadline
👉 मित्रांनो, आळस येण्याचे तिसरे कारण म्हणजे कोणत्याच कामाला Deadline न देणे...
समजा, तुम्ही 1 पुस्तके वाचत आहात परंतु कोणते पुस्तक कुठे पर्यंत वाचायचे हेच माहिती नसेल तर पुस्तके वाचताना आळस येतो...
आपण जर एक पुस्तक दिवसभर वाचत बसु तर आपल्याला काहीच समजणार नाही आणि आपल्याला आळस येईल...
मित्रांनो,कोणतेही काम करत असताना त्या कामाला Deadline द्याला हवी... होत काय जेंव्हा आपण एखाद्या कामाला Deadline देतो तेंव्हा ते काम पूर्ण होण्याचे चान्स 99% वाढत असतात...
( मित्रांनो, Deadline हा Time Management या कोर्सचा एक भाग आहे... तुम्हाला Time Management कोर्स करायचा असेल तर नक्की आमचे Workshop जॉईन करा... )
4) प्लॅनिंग नसणे / योजना नसणे
👉 मित्रांनो, कोणते काम कसे करायचे याची योजना तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येईल आळस येईल, त्यामुळे कोणतेही काम करतांना सर्वात प्रथम एका कागदावर योजना तयार करा आणि त्या योजने नुसार काम करा असे केल्याने तुम्हाला आळस येणार नाही...
5) आजचे काम आजच करा....
👉 मित्रांनो, आळस येण्याचे 5 वे कारण म्हणजे आजचे काम उद्यावर ढकलणे...
मित्रांनो, खुप लोक आजचे काम उद्यावर ढकलतात आणि दुसऱ्यादिवसी कामाचा लोड असल्यामुळे कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नाही...
मित्रांनो, आजचे काम आजच पूर्ण करण्याची सवय स्वतःला लावा... असे केल्याने तुम्हाला आळस अजिबात येणार नाही...
6) वेळेचा सदुपयोग करा...
👉 मित्रांनो, अभ्यास करत असताना किंवा एखादे महत्वाचे काम करत असताना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप बंद करून ठेवा...
होत काय... जेंव्हा आपण अभ्यासाला बसतो तेंव्हा अचानक जर मोबाईल मध्ये एखादे नोटिफिकेशन आले तर आपण लगेच मोबाईल चेक करतो... मोबाईल चेक करत असताना आपण मोबाईल मधले नोटिफिकेशन पाहतो, नंतर आपल्या मित्राने कोण कोणते स्टेटस ठेवले हे पाहायला सुरुवात करतो... आणि आपला वेळ कुठे जातो याचेच आपल्याला भान राहत नाही... आणि नंतर सर्व काम तसेच राहते....
मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची एक वेळा पत्रक तयार करा... टीव्ही किती तास पाहायची... मोबाईल किती तास पाहायचा याचे वेळा पत्रक तयार करा... असे केल्याने तुमच्याकडे खुप सारा वेळ राहील आणि तुम्ही तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण कराल... 👍
7 ) शांत झोप घ्या...
मित्रांनो, आळस दुर करण्यासाठी रोज रात्री 7 घंट्याची झोप घ्या...
झोप पूर्ण झालेली नसेल तर तुम्ही जे काम कराल त्यामध्ये तुमचे मन लागणार नाही आणि काम करत असताना तुम्हाला आळस येईल.... त्यामुळे रोज रात्री 7 घंट्याची झोप घ्या...
मित्रांनो, लेख आवडला असेल तर नक्की share करा... धन्यवाद 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
खुप छान सर 🌻🌻
उत्तर द्याहटवाNice.....
उत्तर द्याहटवा7 तासांची झोप.
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा