Attitude is Everything...



👉 मित्रांनो, Attitude बद्दल अधिक माहिती जाणून घेण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या... काळजी नका करू प्रश्न खुप सोपे  आहेत... 

1) जंगल मधला सर्वात उंच प्राणी कोणता...? 

2) जंगल मधला सर्वात ताकदवान प्राणी कोणता आहे...? 

3) जंगल मधला सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता आहे...? 

4) जंगल मधला सर्वात बुद्धिमान हुशार प्राणी कोणता आहे...? 


मित्रांनो,  या प्रश्नाचे उत्तर असे आहेत... 



1) जंगल मधला सर्वात उंच प्राणी जिराफ आहे 

2) जंगल मधला सर्वात ताकदवान प्राणी हत्ती आहे 

3) जंगल मधला सर्वात वेगाने धावणारा प्राणी चित्ता आहे 

4) जंगल मधला सर्वात बुद्धिमान आणि हुशार प्राणी Chimpanzee आहे 


मित्रांनो, तुमच्या सर्वांना माझा एक प्रश्न आहे... या चार प्राण्यामधुन जंगलाचा राजा कोण आहे...? 


तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे... जंगलाचा राजा सिंह आहे... 



👉 मित्रांनो, सिंह हा जिराफ सारखा उंच नाही, आणि चित्ता सारखा वेगाने धावु शकत नाही, तसेच सिंह हा हत्ती  सारखा ताकदवान सुद्धा नाही आणि Chimpanzee सारखा बुद्धिमान सुद्धा नाही... 

तरी सुद्धा सिंह हा जंगलाचा राजा आहे... 

यामागे काय कारण असेल थोडा विचार करा... 

👉 मित्रांनो, सिंहामध्ये आणि बाकी प्राण्यामध्ये फक्त एका गोष्टीचा फरक आहे तो म्हणजे Attitude चा 

मित्रांनो, सिंह जेंव्हा शिकार करण्यासाठी बाहेर येतो तेंव्हा तो कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यासाठी तयार असतो... मग तो प्राणी त्यांच्या झुंड मध्ये असेल किंवा तो प्राणी सिंहापेक्षा मोठा असेल, सिंह शिकार करतो म्हणजे करतो 

बाकी प्राणी शिकार करण्यासाठी थोडा विचार करतात परंतु सिंह  हा राजा सारखा अटीट्युड ठेवतो आणि राजा सारखा शिकार करतो... शिकार हाती लागो या ना लागो परंतु सिंहाचा अटीट्युड एवढा भयानक असतो कि त्याला पाहुन चांगले चांगले प्राणी सुद्धा पळुन जातात... आणि याच अटीट्युड मुळे सिंह हा जंगलाचा राजा आहे... 


👉 मित्रांनो, Attitude is Everything हे वाक्य तुम्ही खुप वेळा वाचले असेल किंवा पाहिले असेल... हे वाक्य 100% बरोबर आहे... 


मित्रांनो, आपली प्रत्येक गोष्ट हि आपल्या अटीट्युडवर डिपेंड  असते... 

खुप लोकांना प्रश्न पडला असेल कि प्रत्येक गोष्ट जर अटीट्युडवर डिपेंड करत असेल तर मग शिक्षणाचा उपयोग काय... 


👉 मित्रांनो, एक गोष्ट लक्षात  ठेवा, तुमचे जीवन तसे नाही जसे तुम्हाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सांगितलं जाते... 

जीवनाची जी ओरिजिनल कन्सेप्ट आहे ती थोडी वेगळी आहे, आणि हि कन्सेप्ट शिक्षकांना सुद्धा माहिती नाही... विचार करा प्रत्येक शिक्षकांना जीवनाची  ओरीजिनल कन्सेप्ट माहिती असती तर ते लोक शिक्षकांची जॉब केली असती का....?  

प्रत्येक शिक्षकांची Passion Teaching मध्ये असती तर ते सर्व सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार सारखे प्रसिद्ध झाले असते ना... आणि ह्रितिक रोशन सारखा सुपर स्टारने  त्यांच्या जीवनावर  एखादा movie काढला असता.. 



👉 मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या... आनंद कुमार हे सुद्धा एक साधारण शिक्षक आहेत.. मग यांच्या मध्ये आणि बाकी शिक्षकांन मध्ये काय फरक आहे... 

तो फरक आहे...  अटीट्युडचा 

👉 मित्रांनो, बाकी शिक्षक Teaching ला एक जॉब समजतात, विद्यार्थी लोकांना शिकवणे हे पैशाचे एक साधना समजतात... आणि शिकवतात 

परंतु 

आनंद कुमार सर Teaching ला त्यांचा धर्म समजतात... आणि त्यांची  शिकवण्याचा पद्धत खुप छान आहे... प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांना ते फुकट शिकवतात आणि प्रत्येक वर्षी त्यांचे 30 विद्यार्थी हे IIT मध्ये सिलेक्ट सुद्धा होतात.. 


👉 मित्रांनो, एक शिक्षक किती मोठा बनेल हे त्याच्या डिग्रीवर डिपेंड करत नाही तर त्याच्या अटीट्युडवरती डिपेंड करत असते...

👉 मित्रांनो, तुम्ही जर अटीट्युड शब्दाचा अर्थ google वरती पाहिला तर त्याचा अर्थ होतो, तुमचा पाहण्याचा दृष्टीकोण, तुम्ही कोणत्या कामाला कोणत्या दृष्टीकोनाने  पाहता त्याला म्हणतात अटीट्युड 


मित्रांनो, तुम्ही भारतीय क्रिकेटर विराट कोहली सरांना ओळखता का..? 

आज विराट कोहलीला सर्व जग ओळखते... प्रत्येक खेड्या गावात सुद्धा विराट कोहलीचे नाव आहे... 


👉 मित्रांनो, एक विचार करा या जगात क्रिकेटर तर खुप आहेत मग विराट कोहली किंवा 2, 4 क्रिकेटरच का फेमस आहेत...? 

क्रिकेट खेळणारे क्रिकेटर या जगात खुप आहेत परंतु विराट कोहली सारखा क्रिकेटर नाही... यामागे काय कारण असेल याचा एकदा विचार करा 

👉 विराट कोहली हा जगातील  सर्वात बेस्ट बॅट्समन आहे... Test Match असेल किंवा ODI match किंवा T20 match प्रत्येक match मध्ये विराट कोहली जबरदस्त खेळतात 

आणि त्यानी खुप अवॉर्ड सुद्धा जिकंलेले आहेत जसे कि, ODI Player of the year, Test Player of the year आणि T20 Player of the year हे सर्व अवॉर्ड त्यांनी प्राप्त केले आहेत... 



मित्रांनो, हे झाले क्रिकेटचे  अचिव्हमेंट परंतु विराट कोहली सरची सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती आहे तर ती आहे अनुष्का शर्मा ( ऍक्टर ) सोबत लग्न करणे.. 

👉 अनुष्का शर्मा ह्या एक प्रसिद्ध  ऍक्टर आहेत, त्यांची झलक पाहण्यासाठी लाखो लोक वाट पाहतात... परंतु अनुष्का शर्माचे life पार्टनर  कोण आहेत तर ते आहेत विराट कोहली सर.. 



👉 मित्रांनो, विराट कोहली सर ने खुप  सारे अवॉर्ड प्राप्त केले, खुप साऱ्या गोष्टी प्राप्त केल्या... परंतु प्रश्न असा आहे कि, विराट कोहली सर मध्ये अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या मुळे त्यांनी खुप सारे अवॉर्ड जिकंले आहेत, आणि ते त्यांच्या जीवनात यशस्वी झाले आहेत...  

👉 मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का विराट कोहली सरचे success सीक्रेट काय आहे...? 

मित्रांनो, एकदा interview मध्ये एका पत्रकाराने विराट कोहली सरांना एक प्रश्न विचारला... 



त्यांचा प्रश्न होता, कि तुम्ही प्रत्येक Match मध्ये एवढे जबरदस्त खेळता, खुप रन काढता.. खराब पीचवर सुद्धा खुप रन काढता... यामागे काय कारण आहे... तुम्ही हे सर्व कसे करता...? 


यावर विराट कोहली सर ने उत्तर दिले.... 

👉 जेंव्हा मी मैदानात उतरतो तेंव्हा असा विचार करतो कि, हि माझी शेवटची match आहे... मी या match मध्ये जर रन काढले नाही तर पुढच्या match मध्ये मला Team 11 मध्ये जागा मिळणार नाही... आणि आजच्या Match मध्ये मी जर खुप रन काढले तर मी एक Succesfull क्रिकेटर बनेल, त्यामुळे मी प्रत्येक match शेवटची match समजुन शेवट पर्यंत खेळत असतो... मित्रांनो, यालाच म्हणतात Attitude 



👉 मित्रांनो, आपण सर्वानी आपल्या फील्ड बद्दल पॉजिटीव्ह अटीट्युड ठेवला तर आपण सुद्धा आपल्या फील्ड मध्ये यशस्वी होऊ शकतो...  

मित्रांनो, आजच्या काळात तुमच्यामध्ये अटीट्युड असणे खुप गरजेचे आहे... 

मित्रांनो, एखाद्या कामात तुम्ही यशस्वी व्हाल कि अपयशी हे तुमचा अटीट्युड ठरवत असतो... 

तुम्ही बोलत असाल कि, मी MPSC परीक्षा मध्ये पास होईल तर खरंच तुम्ही MPSC मध्ये पास व्हाल... परंतु तुम्ही जर  बोलत असाल कि मी MPSC मध्ये पास होऊ शकत नाही तर तुम्ही खरोखर परीक्षा पास करू शकणार नाही... 

मित्रांनो, एक उदाहरणं सांगतो मोह्हमद अली सरांचे... 



👉 मोहम्मद अली सर हे एक बॉक्सर होते... 

मोहम्मद अली सर, रोज 15 घंटे व्यायाम करत असे, आणि बॉक्सिंगची प्रॅक्टिस करत असे..

परंतु 

जेंव्हा ते प्रॅक्टिस करत तेंव्हा ते Physically Strong बनायचा  प्रयत्न तर करत होते परंतु सोबतच mentally Strong बनायचा सुद्धा प्रयत्न करत असे... 

ते व्यायाम करत असताना हमेशा स्वतःशी बोलत 

I am the greatest, i am the Champion 

I am the greatest, i am the Champion 


असे बोलुन ते पूर्ण जोश  आणि ताकदीने व्यायाम करत असे... हा त्याचा अटीट्युड होता... 

मित्रांनो, No pain no gain हे वाक्य तुम्ही खुप वेळा ऐकलेच असेल या वाक्याचा नारा  सर्वात प्रथम मोहम्मद अली सरने  दिला होता...

👉 मित्रांनो, मोहम्मद अली सर जेंव्हा पण बॉक्सिंग साठी जात असतं तेंव्हा ते पॉजिटीव्ह अटीट्युड  सोबत घेऊन जात... आणि प्रत्येक match ते त्यांच्या अटीट्युड मुळे जिकंत असे... ते स्वतःला एक चॅम्पियन समजतं आणि चॅम्पियन सारखे बॉक्सिंग करत आणि चॅम्पियन सारखे जिकंत... समोरचा व्यक्ती कोण आहे याचे काही घेणं देणं नाही मी एक चॅम्पियन आहे... असा विचार करून ते बॉक्सिंग करत आणि चॅम्पियन सारखे जिकंत सुद्धा.. 

👉 मित्रांनो, मोहम्मद अली  सरांनी  जेंव्हा बॉक्सिंग मधुन रिटायरमेन्ट घेतली होती तेंव्हा त्यानी एक जबरदस्त वाक्य बोले होते.. 

ते म्हणजे असे कि, 

👉 मी बॉक्सिंगला अजिबात miss करणार नाही परंतु बॉक्सिंग मला miss करेल कि मोहम्मद अली सारखा एक व्यक्ती  होता ज्याने बॉक्सिंग ला फेमस केले.. 

मित्रांनो, स्वतः मध्ये अटीट्युड डेव्हलोप करा... कारण अटीट्युड मुळे सर्व गोष्टी साध्य होतात... 

👉 मित्रांनो, जेंव्हा Wright Brothers ने विचार केला होता कि माणुस पक्षी सारखे हवेत उडू शकतील... आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते हवेत जातील हा त्यांचा विचार होता... त्यानी हा विचार खुप लोकांना सांगितला सुद्धा तेंव्हा खुप लोक त्यांच्यावर हसले सुद्धा असतील... कोणी बोले असेल तुम्ही दोघेही पागल झाले आहात लोखंडी वस्तू हवेत कशा  उडतील...  

परंतु 

Wright  Brothers यांचे स्वप्न आणि त्यांचा अटीट्युड खुप मजबूत होता,  लोक काय बोलतील त्यावर त्यांनी अजिबात  ध्यान दिले नाही आणि एक असे साधन तयार केले ज्याला आज आपण विमान म्हणतो.... 



👉 मित्रांनो, आजच्या जगात जे पण शोध लागले ते फक्त एका गोष्टीमुळे ते म्हणजे अटीट्युड

मित्रांनो, ब्लबचा शोध लावणारे अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लावला... हा शोध लावण्यासाठी त्यानी खुप वेळा प्रयत्न केले, आणि  खुप वेळा अपयशी सुद्धा झाले... परंतु त्यांचा अटीट्युड एवढा strong होता कि, त्यांनी एक ब्लब चा शोध लावला म्हणजे लावलाच  आणि पूर्ण जगाला एक नवीन साधन दिले... 



मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आजपासून पॉजिटीव्ह अटीट्युड बाळगा... 


👉 कोणतेही काम करताना स्वतःला सांगा मी हे काम करू शकतो... कारण मी सर्वात स्मार्ट आहे... उशार आहे.... मी हे करू शकतो या पॉजिटीव्ह अटीट्युड ने काम करा... 

तुम्ही तुमच्या कामात नक्कीच यशस्वी व्हाल.... 


यशस्वी आणि अपयशी लोकांन मध्ये फक्त एका गोष्टीचा फरक असतो तो म्हणजे अटीट्युड चा

👉 अटीट्युडचा उपयोग करून तुम्ही तुमचे जीवन बदलु शकता...तुम्हाला नवीन सवयी लावायच्या असतील तर त्या सवयी सुद्धा तुम्ही अटीट्युडमुळे  लावु शकता... 

मित्रांनो,आजच्या लेखामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वतःच्या जीवनात लागु करा... आणि यशस्वी व्हा... 

✍️✍️ नरेंद्र दिपके

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट