स्वतःची किंमत कशी वाढवावी...
मित्रांनो, आपल्याला एखादी वस्तु आवडते आणि ती वस्तु विकत घ्यायला आपण दुकानात जातो परंतु जास्त किंमत असल्यामुळे ती वस्तु आपण विकत घेत नाही... ही वस्तु पुढच्या वर्षी घेऊया असं बोलुन आपण ती वस्तु विकत घेत नाही..
परंतु
पुढच्या वर्षी जेंव्हा तुम्ही ती वस्तु विकत घ्यायला परत जाता तेंव्हा त्या वस्तुची किंमत पहिल्या पेक्षा जास्त झालेली असते...
मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जगातल्या प्रत्येक वस्तु ची किंमत दिवसानुदिवस वाढत आहे...
👉 जगातल्या प्रत्येक वस्तुची किंमत जर थोड्या थोड्या ने वाढत असेल तर आपण आपल्या विचारांची किंमत आणि आपले विचार थोड्या थोड्याने का नाही वाढवावे,
👉 एखादा व्यक्ती एक पुस्तक वाचतो किंवा एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, आणि स्वतःला सर्वात मोठा विचारवंत समजतो, आपल्या विचारात आणि आपल्या कामात भर घालण्याची आता अजिबात गरज नाही अशा मोठ्या गैरसमज मध्ये तो जीवन जगत असतो... आणि जिथे आहे तिथेच राहतो
मित्रांनो, तुम्हाला जेंव्हा पण वेळ मिळेल तेंव्हा स्वतःची किंमत कशी वाढेल याचा विचार करा...
आणि
निगेटिव्ह लोकांन पासुन सावध रहा कारण हे लोकं कळत न कळत आपल्याला आपल्या ध्येयापासुन दुर करतात...
*स्वतःची किंमत वाढवा, आणि सुंदर जीवन जगा...* 😊
स्वतःची किंमत वाढवण्यासाठी खालील गोष्टी अमलात आणा...
1) रोज पुस्तके वाचा..
👉 मित्रांनो, या जगात जेवढे पण यशस्वी लोक आहेत, त्यांना एक सवय असते ती म्हणजे रोज पुस्तके वाचण्याची... तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पुस्तके वाचण्याची सवय लावा... रोज 1 घंटा पुस्तके वाचा...
2) स्वतःला अपडेट करत रहा
👉 मित्रांनो, तुम्ही जे काम करता त्यामध्ये हमेशा अपडेट रहा... तुमच्या फील्ड संदर्भातील सर्व माहिती जमा करा, लक्षात ठेवा, आणि रोज News पेपर वाचा... जग खुप वेगाने बदलत आहे, त्यामुळे रोज News Pepar वाचा.... News पेपर वाचल्यामुळे जगात कोण कोणत्या गोष्टी घडत आहे, कोणत्या नवीन गोष्टी येत आहे... ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला समजतील...मोबाईल App सुद्धा 15 दिवसानंतर अपडेट होतात.. मित्रांनो तुम्ही सुद्धा स्वतःला अपडेट करत रहा...
3) प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करा..
👉 मित्रांनो, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करणे खुप गरजेचे आहे... जेंव्हा तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करता तेंव्हा तुमची किंमत इतरांपेक्षा जास्त होते...
उदाहरणं :- समजा तुम्ही कॉम्पुटर फॉरमॅटचे काम करत असाल तर तुमच्या ग्राहकाचे काम वेळेवर पूर्ण करा... असे केल्याने तुम्हाला खुप सारे ग्राहक मिळतील आणि तुम्ही तुमच्या कामाची fee सुद्धा वाढवु शकता....😊
4) रोज सकरात्मक रहा, आनंदी रहा...
👉 मित्रांनो, प्रत्येक दिवसी सकरात्मक रहायला शिका... प्रत्येक गोष्टीकडे सकरात्मक नजरेने पहा, प्रत्येक काम करताना सकरात्मक विचाराने करा, आहे आणि रोज आनंदी रहा.. तुम्ही जे कोणते काम कराल त्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल...
मित्रांनो, वरील गोष्टी स्वतःच्या जीवनात लागु करा, तुम्हाला नक्की सकरात्मक परिणाम मिळतील आणि तुमची किंमत पहिल्या पेक्षा जास्त वाढेल...
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Khup chan
उत्तर द्याहटवा