पोस्ट्स

आता पुढे काय...??🤷‍♂️

इमेज
  आता पुढे काय...??🤷‍♂️ मित्रांनो, पिंजऱ्यात कैद असलेला पोपट तुम्ही बघितला असेलच...🦜 पिंजऱ्याचा दरवाजा उघडा असला तर पोपट पळुन जाण्याचा नक्की प्रयत्न करतो... परंतु पोपट पिंजऱ्याच्या बाहेर यायला लागला की माणुस परत त्या पोपटाला धरतो आणि पिंजऱ्यात कैद करतो... मित्रांनो, माणुस जसा पोपटाला जबरदस्ती पिंजऱ्याच्या आत कैद करून ठेवतो...त्याचपद्धतीने माणुस स्वतःच्या मनात इतरांबद्दलचा राग, द्वेष, भीती यासारख्या विचारांना पण मनामध्ये कैद करून ठेवतो... मित्रांनो, तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल, बदला घेण्याची इच्छा असेल, चिडचिड असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनात भीती असेल तर तुम्ही आनंदी जीवन कधी जगुच शकणार नाही... जेथे पण तुम्ही जाशाल तेथे तुमच्या मनातील विचार, मनातील भीती तुम्हाला आनंदी राहु देणार नाही... जसे की,  👉 तुम्हाला अंधारात जायची भीती वाटत असेल तर ही भीती तुम्ही जो पर्यंत मनातून काढुन टाकणार नाही तो पर्यंत ही भीती तुमच्या मनामध्येच राहील... तुम्ही अमेरिकेला पण राहायला गेले तरीपण तुम्हाला अंधाराची भीती वाटेल म्हणजे वाटेल... मित्रांनो, तुम्ही जसे पोपटाला पाळत असता तसे...

KFC टेक्निक...

इमेज
  मित्रांनो, आज आपण KFC बद्दल माहिती पाहणार आहोत... K FC म्हणजे ते फ्राय चिकन वाला KFC नाही...हा KFC वेगळा आहे...😄 KFC म्हणजे...म्हणजे Known Find अँड Change  📌 Known - जाणणे... 📌 Find - शोधा... 📌 Change - बदल... Known जाणून घ्या - 👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय हवे आहे, ते व्यवस्थित आणि स्पष्ट जाणून घ्या... Find शोधा - 👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात काय मिळत आहे ते शोधा... ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत करत आहात ती गोष्ट तुम्हाला मिळतं आहे का?? ते शोधा... Change बदल - 👉 मित्रांनो, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही मेहनत करून सुद्धा मिळत नसतील तर कामामध्ये आणि स्वतःमध्ये थोडा बदल करा... मित्रांनो, योग्य दिशेने मेहनत केल्यानंतरच हवे ते परिणाम मिळतं असतात... तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही जर नागपूरच्या दिशेने जात असाल तर... तुम्ही योग्य ठिकाणी कधीच पोहचू शकणार नाही... मित्रांनो, आज संध्याकाळी थोडा वेळ काढुन एकांतमध्ये बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की, आपल्या जीवनात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत....स्वतःचे ध्येय काय आहे...

पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही विचार महत्त्वाचे असतात....

इमेज
मित्रांनो, जीवन असेल किंवा दुनिया, दोघांना ही बॅलेन्स ठेवण्यासाठी पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचारांची गरज असते..... लहानपणापासून आपण सर्वजण हेच ऐकत आलो आहे की, पॉजिटीव्ह विचार करा, पॉजिटीव्ह विचार करायला हवा... निगेटिव्ह विचार करू नका...ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहे... परंतु, कधी कधी निगेटिव्ह विचार पण आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.... मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला पॉजिटीव्ह विचारांसोबत निगेटिव्ह विचार का गरजेचे आहे, याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे....👍🏻👍🏻 मित्रांनो, उद्योजक, मोठंमोठ्याला कंपन्या जेंव्हा पण एखादे नवीन प्रॉडक्ट बनवत असतात तेंव्हा ते पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडने विचार करत असतात.. तुम्हाला काही उदाहरणे सांगतो, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल.... 📌 मित्रांनो, एक पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या व्यक्तीने विमानाचा शोध लावला....विमानात बसून लोकं कमी वेळात लांबचा प्रवास करू शकतील....या उद्देशाने विमानाचा शोध लावला...✈️ 👉 आता, निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांनी हे बघितले की, विमान तर आकाशात उडते...विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाली, विमान क्रॅश होतं असे...

प्रेरणादायी गोष्ट..

इमेज
प्रेरणादायी गोष्ट...🌻 मित्रांनो, एक मोठे श्रीमंत राज्य असते, त्या राज्यामध्ये एक नियम असतो जो खूप वर्षापासून चालत आलेला असतो... 👉 नियम असा असतो की, जो पण राजा बनेल त्याला 5 वर्षानंतर जवळच्या मोठ्या घनदाट जंगलात सोडलं जायाचं... राजा कोणी ही बनो आणि कोणी कितीही चांगले काम करो... शेवटी त्याला जंगलात नेऊन जंगली प्राण्यामध्ये सोडलं जायाचं... एके दिवसी एका साधारण व्यक्तीला त्या राज्याचा राजा घोषित केलं जाते...🤴 त्या साधारण व्यक्तीला माहिती असते की आपण कितीही चांगले काम केले आणि कितीही चांगल वागलो तरी पण शेवटी आपल्याला जंगलात नेऊन सोडलं जाईल... हा साधारण व्यक्ती बाकी राजासारखाच सुरुवातीचे दोन तीन वर्ष खूप एन्जॉय करतो... नंतरच्या दोन वर्षात त्या व्यक्तीला खूप भीती वाटायला लागते, कारण पाच वर्ष संपायला आता फक्त दोन वर्ष बाकी असतात...त्या व्यक्तीला त्याच्या समोर त्याची खतरनाक मृत्यू दिसायला लागते. जंगल दिसायला लागते ज्यामध्ये खूप जंगली प्राणी असतात... तो व्यक्ती त्या जंगलाबद्दल खूप विचार करतो, हुशार व्यक्तीसोबत चर्चा करतो आणि नंतर त्याच्या डोक्यात एक विचार येते, तो एका साधु महाराजाकडे जातो साध...

छोट्या छोट्या सवयीचे मोठे फायदे...🧘‍♂️

इमेज
छोट्या छोट्या सवयीचे मोठे फायदे...🧘‍♂️ मित्रांनो, निसर्ग आपल्याला रोज नवीन दिवस आणि नवीन 24 तास देतो.... 24 तासाचा उपयोग कसा करायचा... हे आपलं आपल्यावर अवलंबून असते.... मित्रांनो, 24 तासाचा उपयोग तुम्ही टीव्ही, इंस्टाग्राम, झोप घेण्यात घालवू शकता...किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळेचा उपयोग करू शकता....निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे... मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या सवयीबद्दल माहिती देणार आहे....आजचा लेख वाचा आणि लेखात सांगितलेल्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागू करा...👇👇 1) पैसे खर्च करण्याआधी कमवायला शिका... 👉 मित्रांनो, पैसे खर्च करण्यापूर्वी आधी पैसे कमवायला शिका.... आई बाबा म्हटल्या म्हटल्या आपल्याला पैसे देतात... आई बाबांनी दिलेले पैसे रिकाम्या गोष्टीमध्ये खर्च करू नका... मित्रांनो, खूप विद्यार्थी असे आहेत की ते जॉब करून रात्री अभ्यास करतात...वेळेचे योग्य नियोजन केलं तर प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला वेळ मिळते.... शिक्षण घेता घेता पैसे कमवण्याचे स्किल्स पण शिका... 2 ) समोरच्या व्यक्तीच म्हणणं ऐकायला शिका... 👉 मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला काही ही बोलण्याआधी ...

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

  स्वतःचा दृष्टीकोन सुधारा 👉 एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नवीन भाडेकरू राहायला येतात. खिडकीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहून बायको नवऱ्याकडे तक्रार करते की लोक खूप चांगले आहेत. पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत.  नवरा म्हणतो, साबण संपला असेल  दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहून बायको परत तेच वाक्य म्हणते की लोक खूप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत. कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.  नवरा ऐकून घेतो असे रोज चालते.  एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहून नवऱ्याला म्हणते, अहो ऐकलंत का? समोरच्या वहिनी सुधारल्या, त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत.  राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या काचा आतुन आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे नाही आपणच सुधारलोय. आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवुन आपण दुसऱ्याकडे पाहिले पाहिजे.

एका सुताराची प्रेरणादायी कहाणी

इमेज
एक सुतार काम करणारा 60 वर्षांचा माणूस होता तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला 40 वर्षे झाले होते. ह्या 40 वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता. तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक 40 वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला रिटायर व्हायचे आहे. आता मालक तर मालक असतात, जाता जाता सुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलच माहिती असते. तेंव्हा मालक त्या सुताराला म्हणतो ठीक आहे. तुला रिटायर व्हायचंय तर तू होऊ शकतोस पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा, ते काम झाल्यानंतर तुझा छान पैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ. एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला. पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेल, पण अजून 3 ...