सकरात्मक दुर्ष्टीकोण...



 सकरात्मक दुर्ष्टीकोण... 

👉 समजा,  तुम्ही  5 व्या मजल्यावर उभे आहात,  तेथून तुम्हाला तुमची सोसायटी, तुमचे  सर्व गाव दिसत आहे,

आता गाव पाहत असताना अचानक तुमच्या डोक्यात विचार येतो की, आमच्या शेजारच्या  इमारतीचा रंग आपल्या  घरासारखा असता तर, आणि  प्रत्येक गावातल्या लोकांनी त्यांच्या घराला गुलाबी रंग द्याला पाहिजे...

👉 हा विचार तुमचा आहे, विचार थोडा वेगळा असून  मजेदार पण आहे, परंतु हा विचार विचार करण्यासारखा आहे,

कारण

👉 शेजारची व्यक्ती त्यांच्या घराला गुलाबी रंग का देतील.... त्यांना पण स्वतःला आवडणारा एखादा रंग असेल

किंवा 

👉 पुर्ण गाव गुलाबी रंग का देईल... हा तुम्ही श्रीमंत असाल तर दोन किंवा तीन घर रंगवू शकता परंतु सर्व गाव गुलाबी कसे करू शकता...?

मित्रांनो, तुम्हाला पुर्ण गाव गुलाबी झालेलं पाहायचच असेल तर  यावर एक उपाय आहे...

👉 तुम्ही गुलाबी रंगाचा चष्मा घाला मग पहा तुम्हाला  सर्व गाव गुलाबी दिसेल की नाही...

👉 मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की... या जगातला प्रत्येक व्यक्ती आपापल्या दुनियेत गुंतलेला असतो.....

👉 पृथ्वी सर्वांसाठी एकच आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा चष्मा घालून या दुनियाकडे  पाहत असतो...

समजा, एखादा व्यक्ती काळा चष्मा घालत असेल, तर साहजिकच आहे  त्याला सर्व दुनिया काळीच दिसेल... 

👉 तुम्ही  जर  या जगाला वाईट चष्मा घालून पाहत असाल तर सर्व दुनिया तुम्हाला वाईटच दिसेल... या दुनियामधले सर्व लोक सुद्धा वाईटच दिसतील... 

मित्रांनो, तुम्हाला जर  वाईट चष्मा घालून आनंद मिळत असेल तर तो चष्मा बदलु नका कारण ज्या गोष्टी केल्यावर आपल्याला आनंद मिळत असेल तर त्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे... 

👉 परंतु आज पर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी नसाल दुःखी असाल तर आता नक्कीच चष्मा बदलण्याची वेळ आलेली आहे असं समजा 

आणि सकरात्मक नावाचा चष्मा घाला...

जेंव्हा तुम्ही सकरात्मक नावाचा चष्मा घालुन या जगाकडे पाहाल तेंव्हा तुम्हाला पाहिजे तसे जग पाहायला मिळेल, 

तुम्हाला कदाचित  एखाद्या गोष्टीच दुःख पण झालं तरी तुम्हाला आनंद मिळेल कारण 

या जगातल्या प्रत्येक वस्तु दोन प्रकारे असतात,

 वाईट × चांगल,  सुख × दुःख, खरं × खोटं 

तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे दोन्ही बाजूने पहा... तेंव्हाच तुम्हाला तुमच्या समस्याचे उत्तर मिळेल... त्यामुळे सकरात्मक रहा... 


👉 मित्रांनो जेव्हापण तुमच्या सोबत वाईट गोष्टी घडतील तेंव्हा तुम्ही खुश राहाल कारण तुम्ही त्या गोष्टीकडे दोन्ही बाजूने पाहु शकाल कारण  

तुम्ही एक सकरात्मक व्यक्ती आहात... 😊

✍️✍️ नरेंद्र दिपके

( Coach of Personality Development )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट