स्वप्न मोठे पहा, परंतु सुरुवात सर्वात लहान गोष्टीपासून करा...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचा परिणाम मिळायला थोडा वेळ लागत असतो... तुम्ही एक दिवस स्वप्न पाहुन एकाच दिवसी यशस्वी होऊ शकत नाही...
( आजचा दिवस उद्याचे भविष्य आहे... आणि हे बरोबर आहे )
त्यामुळे आज तुम्ही जे काम करता, मग काम कोणतेही करा त्यावर तुमचे भविष्य ठरलेलं असते...
👉 खुप सारे विद्यार्थी किंवा लोक अस ठरवतात कि, मी रोज पुस्तके वाचणार आणि स्वतःचे जीवन बदलणार... किंवा रोज व्यायाम करायला जाणार...
मित्रांनो, जीवन बदलणार हा विचार खुप सुंदर आहे... आणि तुम्ही तुमचे जीवन बदलु पण शकता जर तुमची स्वतःची तयारी असेल जीवन बदलण्याची तर... 🤷♂️
👉 जेंव्हा एक व्यक्ती जीवन बदलण्याची तयारी करतो तेंव्हा तो फुल कॉन्फिडन्स मध्ये असतो... परंतु
जसे जसे दिवस जातात तसा तसा त्याचा मधला कॉन्फिडन्स कमी कमी होत जातो....
एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल...
👉 हे पहा जेंव्हा एक मुलगा ठरवतो कि मी उद्या पासुन रनिंगला जाणार आहे तेंव्हा तो मुलगा दुसऱ्या दिवसी सकाळी 5 वाजताचा अलार्म लावतो आणि सकाळी अलार्म वाजायच्या आत उठतो तयारी करतो आणि अलार्म वाजायच्या आत सर्व तयारी करून तो अलार्म बंद करतो... ( ह्या साऱ्या गोष्टी कॉन्फिडन्स असताना होत असतात... )
नंतर तो मुलगा रनिंगला जातो आणि पहिल्याच दिवसी 3 किलोमीटर रनिंग करतो...
दुसऱ्या दिवसी त्याचे हात पाय दुखायला लागतात... तरी सुद्धा तो रनिंगला जाईल आणि 3 किलोमीटर न धावता 1 किलोमीटर धावेल...
तिसऱ्या दिवसी अलार्म वाजला कि झोपेतून उठेल अलार्म बंद करेल... आणि पुन्हा झोपून जाईल... 😄
👉 मित्रांनो, आपण सर्वजण खुप मोठे मोठे स्वप्न पाहतो आणि सुरुवात सुद्धा एकदम मोठी करतो, आणि सुरुवात एकदम मोठी केल्यामुळे आपल्याला थकवा सुद्धा खुप लवकर येतो आणि आपण आपले स्वप्न पूर्ण करण्याचे लगेच थांबवतो... आणि हेच आपलं चुकत असते...
👉 मित्रांनो, तुमचे जे स्वप्न असतील, स्वप्न लहान असतील किंवा मोठे, तुम्ही तुमचे स्वप्न 101% प्राप्त करू शकता... मग तुमचे वय किती हि असो तुम्ही तुमचे स्वप्न प्राप्त करू शकता..
खुप लोकांना प्रश्न पडला असेल कि, सर मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे...?
👉 सर्वात प्रथम मोठे स्वप्न पहा.... ( हो मला माहिती आहे मोठे स्वप्न पाहिल्यावर लोक तुम्हाला पागल बोलतील किंवा तुमच्यावर हसतील सुद्धा... तुम्ही त्या लोकांकडे अजिबात ध्यान देऊ नका... )
मोठे स्वप्न पहा नंतर सुरुवात सर्वात छोट्या गोष्टी पासुन करा...
👉 समजा, तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे... आता मला सांगा तुम्ही लगातार 2 तास एका जागेवर बसु शकता का..? नाही बसु शकत...
परंतु
एखादा चित्रपट सुरु असला कि आपण 2:30 तास टीव्ही समोर सहज बसु शकतो... याचे कारण असे असते कि, चित्रपट पाहताना आपल्याला आनंद मिळतो...
त्याचप्रमाणे
तुम्हाला पुस्तकामध्ये आवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पुस्तकामध्ये आनंद शोधावा लागेल...😊
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि सर हा आनंद कुठे शोधायचा...
👉 हे पहा पुस्तकामध्ये आनंद शोधता येतो, पुस्तक वाचण्याची सवय लावताना लगेच मोठे पुस्तक हातात घेऊन बसु नका... तर सर्वात प्रथम तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीचे पुस्तक वाचा...
गोष्टीच्या पुस्तकामधून जेंव्हा तुम्हाला आनंद मिळायला सुरुवात होईल... नंतर ते पुस्तक वाचुन झाल्यावर तुम्ही कोणते हि पुस्तक वाचायला घेऊ शकता...
आणि एकदा जर तुम्हाला पुस्तके वाचण्याची सवय झाली तर तुम्ही 100 पेक्षा जास्त पुस्तके सहज वाचु शकता...
मित्रांनो, या लेखामध्ये मी जी माहिती सांगितली आहे, ते सर्व माझे अनुभव आहेत... मी आज पर्यंत 70 पेक्षा जास्त पुस्तके वाचलेले आहेत... तुम्हाला सुद्धा तुमचे जीवन बदलायचे असेल तर मोठे स्वप्न पहा... आणि सुरुवात खुप लहान गोष्टीपासुन करा...
आणि लक्षात ठेवा
ससा आणि कासव च्या गोष्टी मध्ये हमेशा कासव जिकंत असतो... जीवन बदलण्याची सुरुवात सर्वात करा परंतु लहान गोष्टी पासुन करा... 😊
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Khup chan ahe... Superb thought
उत्तर द्याहटवा