स्वतःचे आत्मनिरीक्षण कसे करावे....
👉 मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या...
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट कसा करता...?
मिनिमम लोक सकाळी 7 किंवा 8 वाजता उठतात, फ्रेश होतात, टीव्ही पाहतात, ऑफिसला जातात, ऑफिस मधुन घरी येतात, गप्पागोष्टी करतात, जेवण करतात आणि रात्री 10 वाजता झोपून जातात...
मित्रांनो, वरील पद्धतीने जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही यशस्वी होत आहात कि अपयशी हे तुम्हाला अजिबात समजणार नाही...
कारण
तुम्ही तुमचा दिवस रोजच्या दिवसा सारखाच जगत आहात...
👉 मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती करायची असेल, तर रोज सकाळी आणि रोज रात्री एक तास स्वतःसाठी वेगळा काढा...
रात्री वेगळा काढलेल्या वेळामध्ये स्वतःचे आत्मनिरीक्षण करा, स्वतःच्या व्यवसाय बद्दल निरीक्षण करा, स्वतःच्या पैशाबद्दल निरीक्षण करा...
किंवा
तुम्ही दिवसभर कोण कोणते काम केले याचे निरीक्षण करा.... महत्वाचे किती कामे केले आणि किती वेळ वाया घालवला याचे सुद्धा निरीक्षण करायला शिका...
👉 मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी आत्मनिरीक्षण केल्यामुळे दिवसभरात तुम्ही काय केले आणि काय करायचे राहून गेले हे तुम्हाला कळते आणि त्याबाबत तुम्ही अलर्ट राहता...
मित्रांनो, आजपासून रोज रात्री स्वतःचे आत्मनिरीक्षण करण्याची सवय लावा...
👉 रोज रात्री झोपण्यापूर्वी आत्मनिरीक्षण करण्यासाठी एकांतात, शांत ठिकाणी आरामदायी स्थितीत बसा त्यानंतर तुमचे डोळे बंद करा आणि एका तास अगोदर तुम्ही काय करत होते याचा विचार करा...
एका तासा अगोदर तुम्ही कायकाय केले हे आठवल्या नंतर पुन्हा एक तास मागे जा.... असेच एक तास, एक तास मागे मागे जात जात सकाळ पर्यंत जा
तुम्ही सकाळी कोण कोणते काम केले याचा विचार करा आणि सर्व गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा... असे केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढत असल्याचेही तुम्हाला आढळून येईल... 👍
मित्रांनो, वरती सांगितल्या प्रमाणे तुम्ही जर रोज अवलोकन केले तर तुम्हाला खुप साऱ्या गोष्टी माहिती होतील.... समजतील
जसे कि,
👉आज तुम्ही काय केले आणि काय काय करायचे अर्धवट राहिले हे तुम्हाला समजेल
👉 दिवसभरात तुमच्या हातून कोण कोणत्या चुका झाल्या हे तुम्हाला समजतील
👉 तुम्ही कोणत्या चुका केल्या आणि कोणत्या चुका सुधारु शकता हे तुम्हाला माहिती होतील...
मित्रांनो, आत्मनिरीक्षण करण्याची सवय आजपासून आणि आतापासून लावा, आत्मनिरीक्षणाची सवय लावल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात नक्की यशस्वी व्हाल आणि प्रत्येक दिवसाचा आनंद तुम्हाला मिळेल .... 👍
👉 मित्रांनो, तुम्हाला Time Management कोर्स करायचा असेल तर मला व्हाट्सअप वरती MSG करा... सर्व माहिती तुम्हाला व्हाट्सअपला मिळेल....
Whatsapp No :- 9545441697
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for feedback