BWY Day... Busy With Yourself
BWY Day...
👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने BWY Day साठी महिन्यातून एक दिवस वेगळा काढायलाच हवा...
आपण आपले रोजचे काम प्रत्येक दिवसी करतच असतो...
जसे कि,
👉 तुम्ही जर जॉब करत असाल तर रोज ऑफिस मध्ये जाव लागते,... शिक्षक असाल तर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणे... तुमचा एखादा बिजनेस असेल तर रोज मिटिंग घेणे, रोज नवीन कल्पना तयार करणे, रोज कॉल घेणे, ई-मेल चेक करणे,
तुम्ही विद्यार्थी असाल तर रोजच्या To Do List नुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो...
थोडक्यात प्रत्येक जॉब करणाऱ्या व्यक्तीला महिन्याच्या 30 ही दिवस सारखेच काम करावे लागते...
एक गोष्ट लक्षात घ्या..
👉 एक मशीन दिवसाचे 24 तास लगातार काम करू शकते परंतु माणुस त्या मशीन सारखे दिवस भर किंवा महिना भर काम करू शकत नाही...
👉 तुम्ही एकच काम सारखे सारखे करत असाल तर तुम्हाला कंटाळा येणार म्हणजे येणारच... आणि कंटाळा येतो सुद्धा कारण आपण माणुस आहोत... काम केल्यामुळे आपले पूर्ण शरीर तर थकतेच थकते... सोबत दिमाग सुद्धा थकून जात असतो...
मित्रांनो, तुम्ही एकच काम करून परेशान झाले असाल किंवा काम करताना तुम्हाला चिडचिड होत असेल तर तुम्ही BWY Day नक्की बनवायला हवा...
👉 आपल्या सर्वांना प्रत्येक रविवारची सुट्टी मिळते... आणि एका महिन्यात 4 किंवा 5 रविवार येतात... त्या रविवार मधुन कोणताही एक रविवार BWY Day साठी निवडा... पूर्ण एक दिवस स्वतःसाठी द्या... आणि स्वतःला नेहमीच्या वातावरणापासुन कामापासून दुर करा...
एक दिवस मन मोकळे फिरा, निसर्गाचा आनंद घ्या... तुम्ही जॉब करता, किंवा तुम्ही शिक्षक आहात, विद्यार्थी आहात, हे एक दिवसासाठी विसरून जा... एक दिवस लहान मुलांन सारखे वाघा...
तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा... तुमच्या आवडीचा एखादा चित्रपट असेल तर तो चित्रपट पहा... तुमचे आवडीचे जेवण करा...
तुमच्या घरी Dog असेल तर त्याच्या सोबत बोला, त्याच्या सोबत खेळा...
किंवा
तुमच्या आवडीचे एखादे पुस्तक वाचा... मेडिटेशन करा
BWY Day म्हणजे काय..?
👉 व्यवसाय किंवा घरातील कोणत्याही समस्येचा विचार न करता केवळ स्वतःच्या आवडीच्या विषयात स्वतःला डुबवून टाकणे... यालाच BWY Day म्हणतात...
👉 मित्रांनो, जेंव्हा आपण पूर्ण दिवस स्वतःला देतो, स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करतो, स्वतःला रिफ्रेश करतो, ह्या साऱ्या गोष्टी केल्यामुळे स्वतःला एक सकरात्मक ऊर्जा मिळते आणि या सकरात्मक ऊर्जेचा उपयोग करून आपण महिण्याच्या 30 ही दिवस आनंदी राहु शकतो...
मित्रांनो, प्रत्येक बिजनेस, प्रत्येक यशस्वी झालेले लोक सुद्धा BWY Day साजरा करतात... तुम्ही सुद्धा BWY Day साजरा करा... तुम्हाला 100%चांगला परिणाम मिळेल...
मित्रांनो, आज रविवार आहे आणि तुमच्याकडे वेळ मिळाला तर आज *एक उनाड दिवस,* *अशोक सराफ सर* यांचा मराठी चित्रपट नक्की पहा... त्या चित्रपट मधुन शिकण्यासारखे खुप काही आहे... 😊
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Very Nice....
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा