स्वतःची स्मरणशक्ती कशी वाढवावी... ...

 


👉 मित्रांनो, माणसाला मिळालेले  अतिशय मौल्यवान साधन किंवा शक्ती  म्हणजे त्याचा मेंदू आहे... 

तुमची ओळख असेल किंवा तुमची बुद्धिमत्ता असेल किंवा ज्ञान असेल हे सर्व मेंदूवरच अवलंबून असते.. 

👉 मित्रांनो, जेंव्हा तुम्ही तुमच्या डोक्याचा उपयोग योग्य कराल  तेंव्हाच तुम्हाला तुमच्या कामात  यश मिळेल... 

तुमचा मेंदूच तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करीत असतो, तुम्हाला कोणते काम करायचे, कधी करायचे आहे आणि कसे करायचे हे सर्व तुमचा मेंदू तुमच्या सर्व इंद्रियांना आदेश देत असतो...  तसेच तुमच्या बॊधिक ज्ञानाच्या बळावर तुम्हाला श्रेष्ठ ठरवीत असतो... 

मित्रांनो, असा प्रकारे तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी तुमचा मेंदू  तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे काम करत असतो... 

मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कि, स्मरणशक्ती वाढवली जाऊ शकते का...?

या प्रश्नाचे उत्तर आहे *हो* 

👉 मित्रांनो, आपला मेंदू एका चाकू सारखा चमकदार असतो... जेवढा आपण उपयोग करू तेवढा तो चमकत असतो... परंतु आपण जर त्या चमकदार चाकूचा उपयोग केलाच नाही तर  काय होईल... काही दिवसाने त्या चाकू वर जंग जमा होईल आणि तो चाकू काही ही कामाचा राहणार नाही... 


👉 मित्रांनो, जसे चाकूचा उपयोग रोज न केल्याने त्याला जंग लागते त्याचप्रमाणे माणसाच्या मेंदूच असते..  आपण जर आपल्या डोक्याचा उपयोगच करणार नाही तर आपल्या मेंदूला आपल्या बुद्धीलाही जंग लागेल... 


मित्रांनो, मोठे यश मिळविण्यासाठी तुमची स्मरणशक्ती खुप चांगली असणे अतिशय आवश्यक असते,

आणि चांगली स्मरणशक्ती चांगल्या मानसिक विकासावरच अवलंबून असते... 

मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण रोज कपडे बदलत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे विचार आणि तुमची मानसिकताही बदलु शकता.. 


👉 त्यासाठी तुम्हाला रोज पॉसिटीव्ह विचार करावा लागेल, सर्व निगेटिव्ह विचार एका कागदावर लिहून तो कागद जाळून टाका किंवा कचऱ्याचा पेटीत टाकुन द्या...  रोज आनंदी रहा.. स्वतःच्या जीवनात चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि कोणत्या चांगल्या गोष्टी होऊ शकतात किंवा तुम्ही कोणत्या चांगल्या करू शकता त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा...  रोज पुस्तके वाचा...  प्रत्येक व्यक्तीमधल्या 5 चांगल्या गोष्टी शोधा...  सुरुवात करा स्वतः पासुन..  स्वतःमधल्या चांगल्या गोष्टी एका कागदावर लिहा...  तुम्ही असं सुद्धा लिहु शकता... मी माझ्या आई बाबा वर खुप खुप प्रेम करतो... मी माझ्या आई बाबाचा आदर करतो... मी सर्वांन सोबत प्रेमाने वागतो... याप्रमाणे तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी शोधा आणि एका कागदावर लिहा... 



👉 असे केल्याने तुमच्या मध्ये खुप खुप बद्दल होतील... एक तर तुमची मानसिकता बदलेल तुमची स्मरणशक्ती वाढेल... आणि दुसरी गोष्ट म्हणजे जग किती सुंदर आहे याची जाणीव तुम्हाला होते... 

मित्रांनो, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा... तुमचे वय लहान असो किंवा मोठे,  तुम्ही तरुण असाल किंवा म्हतारे असाल... 

तुमच्या जीवनात किती ही प्रॉब्लेम असो तुम्ही तुमचे जीवन 100 बदलु शकता... केंव्हा जेंव्हा तुमची स्वतःची तयारी असेल जीवन बदलण्याची तेंव्हा तुम्ही स्वतःचे जीवन बदलु शकता... 

✍️✍️ नरेंद्र दिपके 

( Coach of Personality Development )

☎️☎️ 9545441697

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for feedback

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*पुस्तकांचे महत्त्व*

स्वतःचा दृष्टीकोन सुधारा

प्रेरणादायी गोष्ट