यशाचे सिद्धांत...
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असतात, व्यक्ती स्वप्न पाहतच मोठा होत असतो, कधी स्वप्न पूर्ण होतात तर कधी अपयश हातात येते... जेंव्हा अपयश हाता मध्ये येते तेंव्हा माणुस बहाणे बनवतो स्वतःला प्रूफ करतो कि मी काय केले आणि कशा मुळे मला अपयश आले...
👉 मित्रांनो, 12th क्लासला जेवढे पण विद्यार्थी नापास होतात ते कधी असे सांगत नाही कि, मी अभ्यास केलाच नव्हता म्हणुन मी नापास झालो.... विद्यार्थी सांगतात कि जे विद्यार्थी पास झाले ते कॉपी करून पास झाले असतील किंवा शिक्षकांनी मला चांगले शिकवले नाही म्हणुन मी नापास झालो...
मित्रांनो, पोलीस लोक जेंव्हा चोराला पकडतात तेंव्हा चोर सुद्धा चोरी केली नाही असं बोलतात...
👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि, जेंव्हापण आपण अपयशी होतो तेंव्हा दुसऱ्याला दोष देत असतो...
मित्रांनो, माझी दररोज जवळपास 25 नवीन लोकांसी भेट होते... आणि ते सुद्धा भूतकाळात घडलेल्या गोष्टीलाच दोष देतात...
जसे कि,
👉 माझ्या घरची परिस्थिती ठिक नव्हती, माझे बाबा दारू प्यायचे, किंवा घरी पैशाचा प्रॉब्लेम होता म्हणुन मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही...
किंवा जीवन जगणे खुप अवघड आहे...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा
आता तुमची जी परिस्थिती आहे तीच तुमची खरी अवस्था आहे...
तुम्हाला वाटतं असेल कि, मला माझे जीवन बदलायचे, परंतु कसे
या लेखामध्ये तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळणार आहे...
👉 मित्रांनो, खुप लोक त्यांचे कारणे मला सांगतात कि, माझी परिस्थिती खुप खराब आहे, माझ्याजवळ पैसे नाही... मला माझे जीवन बदलायचे आहेत... परंतु मी बदलु शकत नाही कारण माझी परिस्थिती तशी नाही आणि हिच माझी औकात आहे मी नवीन काही करू शकत नाही...
मित्रांनो, आताची जी तुमची परिस्थिती आहे, ती तुमच्या कर्माची फळे आहेत... तुम्ही जेवढ्या गोष्टी भूतकाळात केल्या त्याचे फळ म्हणजे तुमची आताची परिस्थिती आहे....
मित्रांनो, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर धार्मिक पुस्तके नक्की वाचा... कारण प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे परंतु शब्दावली वेगवेगळी आहे परंतु अर्थ मात्र एकच आहे...
मित्रांनो, श्री भगवद गीतावर माझा खुप खुप विश्वास आहे... आणि त्यामधले एक वाक्य तुम्हाला सांगत आहे...
* भगवान प्रत्येक वस्तु में.... *
* प्रत्येक जीव में मौजूद है... *
मित्रांनो, श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत कि या संसारातल्या प्रत्येक वस्तुमध्ये आणि प्रत्येक जीवांमध्ये देव आहे...
याचा अर्थ असा आहे कि आपण सुद्धा देवाचे एक रुप आहोत... आपल्यामध्ये सुद्धा देव आहे...
मित्रांनो, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या... ही सृष्टी पुर्थ्वी कोणी निर्माण केली...?
तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे.... पृथ्वी देवाने तयार केली आहे...
तुम्ही ज्या देवावर श्रद्धा ठेवता त्या देवाचे तुम्ही नाव सांगाल जसे कि
देवाने, किंवा अल्लाने,
मित्रांनो, ही पृथ्वी देवाने बनवली आहे, देवामध्ये खुप शक्ती आहे... देवाला पाहिजे तसे जग बदलु शकतो...हे वाक्य तुम्ही टीव्ही सिरीयल मध्ये किंवा पुस्तकात वाचले असेल... हे सारे वाक्य 100% बरोबर आहे...
👉 आता पुन्हा एकदा या दोन ओळीकडे लक्ष द्या
* भगवान प्रत्येक वस्तु में *
* प्रत्येक जीव में मौजूद है... *
👉 मित्रांनो, जी शक्ती देवाकडे आहे ती शक्ती आपल्याकडे सुद्धा आहे... कारण देव आपल्या मध्ये सुद्धा आहे... आपण देवाचे एक रूप आहोत... आपण सुद्धा आपले जीवन आपल्याला पाहिजे तसे बदलु शकतो... स्वतःला बदलु शकतो पूर्ण जगाला बदलु शकतो कारण ती शक्ती आपल्या प्रत्येका मध्ये उपलब्ध आहे...
👉 मित्रांनो, तुम्ही आता पर्यंत जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले का...? तुम्हाला पाहिजे तसे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये आहेत का...? तुम्ही आज आनंदी आहात...?
तुम्ही तुमचे हे सर्व स्वप्न अजुन प्राप्त केल्या नसतील तर कधी प्राप्त करणार आहात.... तुम्ही तुमचे स्वप्न कधी पूर्ण करणार आहात.... लक्षात राहूद्या तुमच्या मध्ये शक्ती आहे, स्वतःचे जीवन बदलण्याची आणि तुम्ही तुमचे जीवन बदलु शकता.... स्वतःवर विश्वास ठेवा
मित्रांनो, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर खालील गोष्टी स्वतःच्या जीवनात लागु करा
1) Set a goal
मित्रांनो, एका कोऱ्या कागदावर तुमचे स्वप्न लिहा... तुमचे goal काय आहेत ते लिहा... तुम्हाला तुमचे Goal माहिती नसतील तर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होऊच शकत नाही...
आजच तुमचे जीवनाचे ध्येय ठरवा... जीवन तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे जीवन कसे जगायचं त्या नुसार Goal ठरवा
2) स्वतःवर विश्वास ठेवा
👉 मित्रांनो, तुम्ही जे goal ठरवले आहे ते पूर्ण तेंव्हाच होतील जेंव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल... स्वतःवर विश्वास ठेवा, आणि स्वतःला सांगा मी माझे स्वप्न पूर्ण करणारच... पॉजिटीव्ह अटीट्युड ने या जगाकडे पहा...
3) कल्पना करा
👉 मित्रांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी कल्पना करा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले आहेत... तुम्ही जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नात जा आणि असं फील करा कि ते स्वप्न तुम्ही जगत आहात...
समजा... तुमचे स्वप्न आहे एक नवीन कार विकत घ्याचे परंतु तुमच्याकडे पैसे नाही... परंतु तुम्ही एक दिवस ती कार नक्की घेणार आहात... आशा वेळी शांत जागे मध्ये जा आणि फील करा कि तुम्ही त्या कार मध्ये बसलेले आहात आणि ती कार तुम्ही चालवत आहात... कल्पना करा आणि ती कार तुम्हाला एक दिवस नक्कीच भेटेल...
👉 यशस्वी झालेले लोक फक्त एका गोष्टी मुळे यशस्वी झाले, ते म्हणजे त्यांना यशाचे सिद्धांत माहिती होते... मित्रांनो, जगातील 98% संपत्ती फक्त 2% लोकांकडे आहे... तर 2 % संपत्ती ही 98% लोकांकडे आहे... या गोष्टीचा एकदा विचार करा
मित्रांनो, श्रीमंत लोक श्रीमंत होत आहेत कारण त्यांना यशाचे सिद्धांत माहिती आहेत... गरीब लोक गरीब होत आहेत कारण त्यांना यशाचे सिद्धांत माहिती नाही...त्यामुळे तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल किंवा तुमच्या कामात यशस्वी व्हायचं असेल तर सिद्धांत जाणून घेण्याचा प्रयत्न करा... 👍
मित्रांनो, आपण सर्वजण आशा जगात राहतो... त्यामध्ये खुप सिद्धांत आहेत...
जसा कि, गुरुत्वाकर्षणचा नियम
तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब तुम्हाला तिसऱ्या मजल्यावरून खाली सोडले तर तुम्ही दोघेही खालीच याल....
मित्रांनो, यशस्वी होण्याचे खुप सारे सिद्धांत आहेत... आणि हे सिद्धांत शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवत नाहीत...
तुम्हाला हे सिद्धांत जाणून घ्यायचे असतील तर एक सोप्पा उपाय म्हणजे यशस्वी झालेल्या लोकांचे पुस्तके वाचा... तुम्हाला सिद्धांत नक्की माहिती होतील...
God bless you... 👍
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
यशाचे सिद्धांत खूप चांगली माहिती
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवा