स्वतःवर प्रेम कसे करावे...
मित्रांनो, तुमच्या मित्रांपैकी असा कोणता मित्र आहे, जो 24 तास तुमच्यासोबत राहतो...?
असा कोणताच मित्र नाही जो 24 तास तुमच्यासोबत राहील....
मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक मित्रामागे काही तरी मतलब असतो, काही तरी कारण असते... त्यामुळेच दोन व्यक्ती एकमेकांचे मित्र बनतात... काम झाले कि मैत्री सपंली...
👉 मित्रांनो, तुमचे खुप सारे मित्र असतील परंतु खरा मित्र कोण आहे हे पहा... तुम्हाला समजेल तुमचा खरा मित्र कोणीच नाही
मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे कि, मतलबी मित्रासोबत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे... बरोबर ना
मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या....
आजची तरुण मंडळी कशामुळे बिघडत आहे....?
याचे उत्तर असे येईल, मोबाईलचा अतिवापर करणे , चांगल्या सवयी नसणे, चांगल्या skills नसणे,
आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या...
वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लागु होते का...?
तुमचे उत्तर काय राहील... Yes/No
👉 मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती मधल्या चुका शोधत असतो... जसे कि मी वरती प्रश्न विचारला तरुण मंडळी कशामुळे बिघडत आहे... तुम्ही सर्वानी उत्तर सुद्धा दिले... परंतु एकाने पण असा विचार नसेल केला कि मी सुद्धा एक तरुण आहे, एक विद्यार्थी आहे...
बाकी विद्यार्थी मोबाईलचा जास्त उपयोग केल्यामुळे बिघडत आहे तर मी माझा मोबाईलचा उपयोग कसा करत आहे... मी माझ्या मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करत आहे कि वाईट कामासाठी... हे स्वतःला विचारा
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने जर स्वतः मधल्या चुका शोधल्या तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो... परंतु असे कोणी करतच नाही....
उदा, खुप सारे मित्रमंडळ हा लेख वाचत असताना माझ्या लेखामधून किंवा माझ्यामध्ये चुका काढत असतील... हाच माणसाचा स्वभाव आहे... दुसऱ्या व्यक्तीमधल्या चुका काढायच्या आणि स्वतः मधल्या चुका लपवायच्या...
👉 मित्रांनो, Personality Development Workshop मध्ये मी एक गोष्ट सर्वांना शिकवत असतो... ती म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका... 👍
* स्वतःवर प्रेम करा *
मित्रांनो, 24 तास एक मित्र तुमच्यासोबत राहतो तो मित्र म्हणजे तुमचे शरीर...
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे शरीराचे दोन भाग आहेत
एक म्हणजे आत्मा आणि दुसरे म्हणजे शरीर
शरीरामध्ये आत्मा आहे म्हणुन शरीर काम करते... आत्मा शरीरात नसेल तर तुमचे शरीर हालचाल सुद्धा करू शकणार नाही... तुम्ही तुमच्या शरीरावर आणि आत्मावर सुद्धा प्रेम करू शकता... 👍
मित्रांनो, स्वतःवर प्रेम कसे करावे याबाबत काही टिप्स तुम्हाला सांगत आहे... त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागू करा... 👍
1) स्वतःशी मैत्री करा
👉 मित्रांनो, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम, तुम्ही जसे असाल तसे स्वतःला स्वीकारा... जेंव्हा तुम्ही स्वतःला सुंदर समजता तेंव्हा तुम्हाला या जगातील प्रत्येक वस्तू सुंदरच दिसायला लागते... मित्रांनो स्वतःला रिस्पेक्ट द्या... आणि स्वतःशी सकरात्मक बोलायाला शिका...
2) आरशात पाहुन स्वतःशी बोला
👉 मित्रांनो, रोज सकाळी उठल्यावर आरशात पहा... आरशात पाहत असताना स्वतःचे डोळे पहा... स्वतःचा चेहरा पहा.... आणि स्वतःशी बोला I like You Friend..., आणि आरशात पाहत असताना स्वतःला यशस्वी झालेले पहा... 👍
3) स्वतःची रिस्पेक्ट करा
👉 मित्रांनो, जसे आपण आपल्या मित्राची रिस्पेक्ट करतो, तशीच रिस्पेक्ट स्वतःची करायला हवी... एखादे काम पूर्ण झाले कि स्वतःला शाबासकी द्या... स्वतःला गिफ्ट द्या...
मित्रांनो, जेंव्हा मी एकटा असतो तेंव्हा स्वतःशी बोलत असतो... प्रत्येक गोष्ट स्वतःला सांगत असतो.... जेंव्हा मी स्वतःशी बोलतो तेंव्हा मला माझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतात....
4) रोज एक तास स्वतःसाठी द्या...
👉 मित्रांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी एक तास स्वतःला द्या... त्या एका तासामधुन पहिल्या 15 मिनिट तुम्ही दिवस भर कोणकोणते काम केले हे आठवण्याचा प्रयत्न करा... नंतच्या 15 मिनिटामध्ये आज कोणत्या चुका केल्या ते आठवा आणि एका कागदावर लिहा... आज केलेल्या चुका उद्या होणार नाही असे स्वतःला प्रॉमिस करा...
तिसऱ्या 15 मिनिट मध्ये मेडिटेशन करा... तुम्हाला मेडिटेशन करण्याची सवय नसेल तर आजपासुन मेडिटेशन करण्याची सवय लावा...
शेवटच्या 15 मिनिटामध्ये स्वतःच्या Life बद्दल पॉजिटीव्ह विचार करा... आणि शेवटच्या 5 मिनिटामध्ये उद्याचा दिवसाची To Do List बनवा आणि To Do List नुसार काम करा....
5) परिणाम
👉 मित्रांनो, जेंव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल तेंव्हा तुम्ही एकटे असताना सुद्धा आनंदी राहाल.... जेंव्हा तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीची रिस्पेक्ट करण्याची सवय लावाल तेंव्हा तुम्ही एक वेगळेच जीवन जगाल... आणि सर्व लोक तुमचे मित्र बनतील... 👍
स्वतःला वर प्रेम करा... लोक तुमच्यावर प्रेम करतील...
मित्रांनो, लेख आवडला असेल तर नक्की Share करा...
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
😊💫💫
उत्तर द्याहटवाKhup chhan tumhi dilelya Motivshon mi nakki upyog krel thanku sir.....
हटवाAsech Motivshon aamhala det raha Thanku....
khup Chaan...
उत्तर द्याहटवा