Empathy is Most Important Skills...
👉 मित्रांनो, आता पर्यंत तुम्ही खुप साऱ्या Skills बद्दल ऐकले असेल... परंतु Empathy या skills बद्दल तुम्ही कदाचित ऐकले नसेल...
👉 मित्रांनो, आजच्या काळात जर प्रत्येक व्यक्तीने Empathy ला समजले किंवा Empathy Skills Develop केली तर.... प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलेल, प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजुन घेईल... गरीब, श्रीमंत, भिकारी असे लोक तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही... प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर प्रेम करेल.... एवढी शक्ती या Empathy मध्ये आहे
Personality Develop करण्यासाठी Empathy skills समजणे खुप खुप गरजेचे आहे महत्वाचे आहे...
चला मग समजुन घेऊया Empathy बद्दल
👉 मित्रांनो, Empathy या शब्दाचा मराठी अर्थ होतो समानुभूती होतो
आणि
👉 अजुन एक शब्द Empathy ला मिळता जुळता आहे, तो शब्द म्हणजे sympathy
Sympathy या शब्दाचा मराठी अर्थ होतो सहानुभूती
मित्रांनो, खुप लोक समानुभूती आणि सहानुभूती या दोन शब्दामध्ये खुप गोंधळलेले असतात... कोणत्या शब्दाचा अर्थ काय होतो हे त्यांना माहितच नसते...
1) Sympathy ( सहानुभूत ) म्हणजे काय...?
👉 समजा, तुमच्या मित्राच्या घरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला... तुम्ही त्या ठिकाणी जाता तुम्ही तुमच्या मित्राला समजवता, रडु नको, जे व्हायचं ते झालं,... थोडक्यात म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला सहानुभूती देता... दुःखातून मुक्ततता करता, मित्राला दिलासा देता यालाच Sympathy म्हणतात.
2) Empathy ( समानुभूती ) म्हणजे काय...?
👉 समजा, एक आंधळा व्यक्ती आहे, त्या आंधळ्या व्यक्तीला रोज कोण कोणत्या अडचणीला तोंड द्यावे लागतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा तसे फील करायचे असेल तर
तुम्ही एक काम करा सकाळी झोपेतून उठल्यावर डोळयांवर पट्टी बांधा... तुम्हाला समजेल कि आंधळ्या लोकांना रोज कसे प्रॉब्लेम येतात... मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीच्या जाग्यावर स्वतःला ठेवणे, त्यांच्या भावना समजुन, तसे अनुभव करणे यालाच Empathy म्हणतात...
👉 मित्रांनो, आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये जर कोणी चुकीचे काम केले तर... आपण कोणताच विचार न करता त्याला बोलतो, त्याचा अपमान करतो.... समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे... हे समजुन घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करत नाही तसा विचारच विचार सुद्धा करत नाही.... मित्रांनो असे वर्तणूक करणे खुप चुकीची आहे...
मित्रांनो, जेंव्हा पण कोणाकडून एखादी चुक झाली असेल तर....तेंव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा...
👉 मी त्या व्यक्तीच्या जागी असतो तर मी काय केले असते... मी कोणता विचार केला असता...
मित्रांनो स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवुन पहा तेंव्हा तुम्हाला जाणवेल कि समोरच्या व्यक्तीने जी चुकी केली ती त्याच्या नजरेने बरोबर होती... किंवा त्या व्यक्तीने चुकीचे काम का केले याचे कारण तुम्हाला नक्की समजेल नक्की मिळेल... 👍
मित्रांनो, एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल..
👉 समजा, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात... मी एका कोऱ्या कागदावर मोठ्या अक्षरात M काढतो आणि तुम्हाला विचारतो हे काय आहे....
आता तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्या जाग्यावरून तो शब्द तुम्हाला W दिसेल... आणि तुम्ही मला सांगाल कि हे अक्षर W आहे
परंतु मी तर M लिहिला होता मग तुम्हाला W कशा दिसतो...
👉मित्रांनो, तुम्ही तुमच्या जागेवर एकदम बरोबर आहात.. तुम्हाला तो शब्द W दिसत आहे, कारण तुम्ही त्या अँगलने त्या शब्दाला पाहत आहात...
मला M दिसत आहे कारण मी वेगळ्या दिशेने बसलेला आहे
मित्रांनो, येथे तुम्ही तुमच्या जाग्यावर एकदम बरोबर आहात आणि मी माझ्या जाग्यावर एकदम बरोबर आहे... येथे फरक आहे तो फक्त नजरेचा आणि दिशेचा....
👉 मित्रांनो, एक विचार करा
आपण जर प्रत्येक प्रॉब्लेमला वेगवेगळ्या नजरेने पाहिले तर आपल्याला सुद्धा प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन नक्की मिळेल... परंतु आपण प्रत्येक प्रॉब्लेमला वेगळ्या नजरेने दिशेने पाहतच नसतो...
मित्रांनो, तुमच्या जीवनात किती ही मोठा प्रॉब्लेम असो, प्रत्येक प्रॉब्लेमला वेगवेगळ्या दिशेने पाहायला शिका.... प्रत्येक व्यक्तीच्या चुका काढण्यापेक्षा स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी उभे करा... तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्युशन नक्की मिळेल 👍
मित्रांनो, जेंव्हा मी शाळेत होतो तेंव्हा एक गोष्ट ऐकली होती ती गोष्ट आज मी तुमच्याशी share करत आहे..
👉 मित्रांनो, एका गावात 4 अंध व्यक्ती राहत होते, त्यांचा एक शिक्षक होता जो त्यांना ट्रैनिंग देत होता...
ते 4 व्यक्ती अंध असल्यामुळे त्यांनी कोणतीच गोष्ट कधीच पाहिली नव्हती.... एक दिवस त्यांच्या गावात हत्ती येतो...
त्या 4 अंध व्यक्तीला तो हत्ती पाहायचा असतो परंतु ते पाहु शकत नाही... त्यामुळे ते 4 चार अंध व्यक्ती त्या हत्तीजवळ जातात आणि त्या हत्तीला हात लावुन पाहतात, आणि विचार करतात कि हा हत्ती कसा असेल
मित्रांनो, ते 4 चार ही अंध व्यक्ती हत्तीच्या वेगवेगळ्या पार्टला स्पर्श करतात आणि हत्ती तसाच दिसत असेल असं समजतात..
👉 एक व्यक्ती हत्तीच्या सुंडला हात लावतो आणि बोलतो हा हत्ती अजगर सारखा आहे...
👉 दुसरा अंध व्यक्ती त्या हत्तीच्या शेपटीला हात लावतो आणि समजतो कि हा हत्ती तर एका दोरीसारखा आहे...
👉 तिसरा अंध व्यक्ती त्या हत्तीच्या पायाला स्पर्श करतो आणि समजतो कि हा हत्ती तर एका झाडाच्या खोडा सारखा आहे...
👉 चोथा व्यक्ती त्या हत्तीच्या पोटाला हात लावतो आणि विचार करतो कि हा हत्ती तर भरलेल्या पोत्या सारखा भक्कम आहे...
मित्रांनो, चार ही अंध व्यक्ती एका जाग्यावर येतात तेंव्हा त्यांचा ट्रेनर त्यांना विचारतो हत्ती कसा आहे...
त्यावर सर्व अंध व्यक्ती ज्या ज्या पार्टला स्पर्श केला आणि जसे त्याना वाटलं तसे उत्तर देतात... कोणी म्हणते दोरी सारखा आहे... कोणी म्हणते झाडाच्या खोडा सारखा आहे... कोणी म्हणते अजगर सारखा आहे... कोणी म्हणते पोत्या सारखा आहे....
आणि त्या चारही व्यक्तीचे आपापसात भांडण सुरु होतात
मित्रांनो, या चार अंध व्यक्तीचे उत्तर ऐकून तो ट्रेनर त्यांना पुन्हा त्या हत्तीजवळ नेतो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशेने स्पर्श करायला लावतो
ज्याने सोंडेला स्पर्श केला त्याला पायाला स्पर्श करा लावतो...
ज्याने अगोदर पायाला स्पर्श केला होता त्याला सोंडेला स्पर्श करा लावतो...
प्रत्येकाला वेगवेगळ्या पार्ट ला स्पर्श करा लावतो तेंव्हा त्या चार अंध व्यक्तींना समजते कि प्रत्येक व्यक्ती त्याचा जागेवर एकदम बरोबर आहे... प्रत्येक व्यक्तीला हत्ती तसाच दिसला जसा त्याने स्पर्श केला होता
मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट खरोखर खुप सुंदर आहे...
👉 मित्रांनो, आपण आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीला एकाच नजरेने पाहत असतो.... आणि तसाच विचार करत असतो परंतु हे चुकीचे आहे मित्रांनो
तुमच्या जीवनात ज्या प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमला वेगवेगळ्या दिशेने पाहायला शिका.... तसेच प्रत्येक व्यक्तीबदल समानुभूती ठेवा...
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीबद्दल समानुभूती ठेवा, प्रत्येक व्यक्तीला समजुन घेण्याचा प्रयत्न करा... असे केल्याने तुमच्या मध्ये खुप सारा फरक आढळून येईल... तुम्ही जेंव्हा लोकांना समजुन घ्यायल, लोकांवर प्रेम कराल तेंव्हा लोक सुद्धा तुमच्यावर प्रेम करतील...
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीबद्दल समानुभूती ने वाघा... 👍
👉 मित्रांनो, Empathy आणि Sympathy चा उपयोग तुम्ही तुमच्या बिजनेस मध्ये सुद्धा करू शकता...
ग्राहकांच्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत हे तुम्ही ओळखू शकता... तसेच चिडलेल्या ग्राहकांना तुम्ही शांत करू शकता....
ग्राहकाच्या जागी स्वतःला ठेवा आणि स्वतःला विचारा मला एखादे प्रॉडक्ट विकत घ्यायला आवडेल कि नाही... आवडत असेल तर का आणि नसेल आवडत तर का नाही आवडत हे सर्व प्रश्न स्वतःला विचारा... तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि तुमचा बिजनेस सुद्धा वाढेल... 👍
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही प्रत्येक माणसांसोबत प्रेमाने बोलता, प्रत्येकाची दया करता, प्रत्येकाशी हसून बोलता तेंव्हा प्रत्येक व्यक्ती सुद्धा तुम्हाला तसाच फीडबॅक देत असतात... तुम्ही प्रत्येक व्यक्तीवर प्रेम कराल तर प्रत्येक व्यक्तीसुद्धा तुमच्यावर प्रेम करेल... 👍
👉 मित्रांनो, तुम्हाला तुमची Personality Develop करायची असेल तर आमचे Workshop नक्की जॉईन करा... 👍
तसेच
वेळेचे नियोजन कसे करावे यासाठी आमचा Time Management कोर्स नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा अथवा व्हाट्सअप करा - 9545441697
धन्यवाद... 🙏
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Khup chan sir ����मीही आजपासून माझ्या जीवनात Empathy चा उपयोग करेन
उत्तर द्याहटवाKhup chan sir👌👌मीही आजपासून माझ्या जीवनात Empathy
उत्तर द्याहटवाचा उपयोग करेन
Khup chan sir 👌👌मीही आजपासून माझ्या जीवनात Empathy चा उपयोग करेन
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवा