Positive Attitude..
* सकरात्मक दृष्टिकोन *
मित्रांनो, आपण आपल्या जीवनात किंवा आपल्या कामात यशस्वी होऊ कि अयशस्वी होऊ हे आपला दृष्टीकोन ठरवत असतो...
सकरात्मक दृष्टीकोनाला इंग्लिश मध्ये Positive Attitude म्हणतात...
मित्रांनो, सकरात्मक दृष्टीकोन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्या अगोदर आपण दृष्टी आणि दृष्टीकोन यामधला फरक समजून घेऊया...
👉 दृष्टीकोन बद्दल खुप लोकांचा एक गैरसमज असतो तो म्हणजे ज्या गोष्टी ते लोक पाहतात त्यालाच दृष्टीकोन समजतात...
मित्रांनो, जिथंपर्यँत तुमची दृष्टी पोहचत असते, तो तुमचा दृष्टीकोन नसतो, तर ते फक्त तुमचे पाहणे असते, यालाच दृष्टी म्हणतात...
तुम्हाला दिसणाऱ्या वस्तूकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता, तो तुमचा दृष्टीकोन असतो..
👉 मित्रांनो, तुम्ही एखादे काम करण्यापूर्वीच ते काम यशस्वी झाल्याचे पाहत असाल, तर तो तो तुमचा सकरात्मक दृष्टीकोन असतो...
तसेच एखादे काम सुरु करण्यापूर्वीच ते काम अयशस्वी झाल्याचे जर तुम्ही पाहत असाल किंवा तसा विचार करत असाल, तर तो तुमचा नकरात्मक दृष्टीकोन असतो...
👉 मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असे आहे कि, तुम्ही जसा विचार करत असता किंवा ज्या दृष्टीने तुम्ही पाहत असता, तसेच तुम्हाला परिणाम मिळत असतात...
उदाहरणं,
👉 तुम्ही MPSC किंवा UPSC परीक्षा देण्याअगोदर त्या परीक्षेला कोणत्या दृष्टीने पाहता हे खुप महत्वाचे आहे... तुम्ही परीक्षेला पॉसिटीव्ह अटीट्युड ने पाहत असाल किंवा पॉसिटीव्ह विचार करत असाल तर तुम्हाला परिणाम सुद्धा तसाच मिळेल जसा तुम्ही विचार कराल...
समजा, परीक्षा देण्या अगोदरच तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत असाल, स्वतःला निगेटिव्ह गोष्टी बोलत असाल जसे कि परीक्षा खुप अवघड आहे, परीक्षा मध्ये मी नापास होईल, जेंव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टी वारंवार करता तेंव्हा तुम्हाला परिणाम सुद्धा निगेटिव्हच मिळत असतात....
👉 मित्रांनो, Time Management कोर्स करण्यासाठी जे विद्यार्थी मला whatsapp ला msg करतात, त्यांचे गोल जवळपास एक सारखेच असते... नंतर मी त्यांना प्रश्न विचारतो MPSC परीक्षा आता पर्यंत किती वेळा दिली तर त्यांचे उत्तर असते... एक दोन वेळा दिली परंतु सराव म्हणुन दिली...
मित्रांनो यालाच निगेटिव्ह अटीट्युड म्हणतात... आणि जे विद्यार्थी असा विचार करतात कि या परीक्षेला फक्त बसु फक्त पेपर देऊ आणि पुढच्या परीक्षेला पास होऊ असे विद्यार्थी कधी पास होत नाही...
या जागी जर एक सकरात्मक व्यक्ती असेल तर तो कसा विचार करेल ते पाहुयात...
👉 सकरात्मक व्यक्ती सर्वात प्रथम परीक्षा आल्यावर तो स्वतःशी पॉसिटीव्ह संवाद करेल... नंतर परीक्षा बद्दल पॉसिटीव्ह अटीट्युड ठेवेल... पॉसिटीव्ह अटीट्युड असा कि, मी ही परीक्षा पूर्ण तयारी ने देत आहे... आणि मला विश्वास आहे जेंव्हा या परीक्षेचा Result लागेल तेंव्हा माझं नाव पास झालेल्या यादी मध्ये नक्की असेल... जेंव्हा तो चांगला विचार करेल, सकरात्मक दृष्टीकोन ठेवेल तेंव्हा त्याला Result सुद्धा सकरात्मकच मिळेल... यालाच म्हणतात पॉसिटीव्ह अटीट्युड
👉 मित्रांनो, आजच्या जगात जेवढे पण शोध लागलेले आहेत, जसे कि विमान असेल, संगणक असेल किंवा टीव्ही असेल, जहाज असेल या साऱ्या गोष्टी फक्त पॉसिटीव्ह अटीट्युड मुळेच अस्तित्वात आलेल्या आहेत...
मित्रांनो, हमेशा एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जे कोणते काम करत असाल किंवा करणार आहात त्या कामाबद्दल हमेशा हमेशा पॉसिटीव्ह अटीट्युड ठेवा... आणि असा विचार करा तुम्ही तुमच्या कामात यशस्वी झालेले आहात... जेंव्हा तुम्ही स्वतःला यशस्वी झाल्याची कल्पना करता तेंव्हा तुम्ही वर्तमानमध्ये सुद्धा नक्कीच यशस्वी होत असता... 👍
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
खूप छान मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली सर अभ्यासासाठी ,,,
उत्तर द्याहटवा