Stop Making Excuses...
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे काही न काही कारणे असतात आणि त्या कारणांमुळे ते यशस्वी झालेले नसतात जसे कि,
1) जीवन जगणे खुप अवघड आहे
2) माझ्या घरचे गरीब आहेत, त्यामुळे मी यशस्वी झालो नाही
3) माझे खुप मोठे स्वप्न होते परंतु माझ्या आई बाबा मुळे ते पुर्ण झाले नाही, पैशाचा प्रॉब्लेम होता...
4) मी जिथे राहतो तिथले लोक चांगले नाही त्यामुळे मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो नाही...
5) श्रीमंत व्हायला पण नशीब लागते आणि मी नशीबवान नाही
6) श्रीमंत झालेले लोक खुप नशीबवान आहेत...
7) मला माझे जीवन बदलायचे परंतु कसे बदलु
8 ) नवीन गोष्टी शिकण्यासाठी, माझ्याजवळ वेळ नाही...
👉 मित्रांनो, माझ्या वोर्कशॉप मध्ये जे विद्यार्थी सहभाग घेतात त्यांना त्यांच्या life बद्दल, त्यांच्या Goal बद्दल प्रश्न केला तर त्यांचे सुद्धा असेच उत्तर सांगतात, असेच कारणे सांगतात... 🤷♂️
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती त्याच्या भूतकाळात झालेल्या गोष्टीला दोष देत असतो... आई बाबा असतील किंवा शाळेतले शिक्षक यांना सुद्धा खुप लोक दोष देतात... आणि त्यांची जी परिस्थिती आहे त्याच परिस्थिती मध्ये जीवन जगतात...
मित्रांनो, या जगात यशस्वी झालेल्या महान लोकांचे उदाहरणं पाहुयात...
1) थॉमस एडीसन सर जेंव्हा शाळेत होते तेंव्हा ते मंद बुद्धीचे होते त्यामुळे शिक्षकानी त्यांना शाळेतून हाकलून दिले होते...
2)भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर लहानपणी चहा विकत होते...
3) अमेरिकाचे माजी प्रधानमंत्री बराक ओबामा सर सुद्धा लहानपणी गरीब होते... त्यांचे आई वडील सुद्धा गरीब होते...
4) स्टीफन विल्यम हॉकिंग सर हे तर अपंग होते तरी सुद्धा त्यांनी खुप छान पुस्तके लिहीले...
5) क्रिश गेल ( क्रिकेटर ) जेंव्हा लहान होते तेंव्हा कचरा प्लास्टिक बॉटल जमा करत होते... त्यांचे आई वडील सुद्धा गरीब होते
मित्रांनो, या जगात असे हजारो लाखो उदाहरणं आहेत... ज्यांनी स्वतःची परिस्थिती बदली आणि यशस्वी झाले... हा झाला त्यांचा प्रश्न परंतु खरा आणि महत्वाचा प्रश्न हा आहे कि आता तुम्ही काय करणार आहात...
तुमची आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती मध्येच जीवन जगाल कि तुम्ही तुमची परिस्थिती बदलणार आहात... 🤷♂️
👉 मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक फॅमिली मध्ये असा एक व्यक्ती असतो, ज्याच्या मध्ये सर्वांचे जीवन बदलण्याची ताकद असते.... तुमच्या परिवारासाठी तुम्ही ती व्यक्ती असु शकता...👍
मित्रांनो, स्वतःचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी आणि स्वतःचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगतो...
👉 सर्वात प्रथम एक कोरा कागद घ्या त्यावर तुमच्या कमी लिहा... तुम्ही कोणत्या गोष्टीला भिता ते लिहा... नंतर त्या कागदाला गोळा मोळा करा आणि कचऱ्याच्या पेटीत टाकुन द्या....
आता दुसऱ्या कागदावर तुमचे स्वप्न लिहा, तुमचे goal लिहा.... तुम्हाला तुमचे जीवन कसे जगायचे ते लिहा... आणि जीवनात किती पैसे कमवायचे ते सुद्धा लिहा... नंतर डोळे बंद करा आणि मनातल्या मनात या गोष्टी बोला... नंतर तुमच्या रोजच्या कामाला लागा...
प्रत्येक रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही लिहीले goal वाचा, पाहा आणि नंत्तर झोपा...
तुमचे जे स्वप्न आहे त्यावर रोज Focus करा.... तुम्हाला तुमचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी लाखो मार्ग मिळतील त्यामधला तुम्हाला आवडेल तो रस्ता निवडा आणि मेहनत करा.... लवकरच तुम्हाला यश मिळेल...👍
यशस्वी होण्याचे सुत्र:-
Goal + Focus +Smart Work = Success
✍️✍️ नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Kay karych?
उत्तर द्याहटवाNice 👍
उत्तर द्याहटवा